कल्याण: कल्याण पूर्वेमध्ये भरदिवसा चोरट्याने दुकानातून गणपतीची मुर्ती चोरल्याची घटना घडली आहे. भरदिवसा दुकानातून गणपतीची मुर्ती चोरीला गेल्यामुळे सध्या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. चोरट्याची करामत दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दुकानातील फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. (Kalyan News)
नवी मुंबई : आगामी गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील ...
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील एका भांड्यांच्या दुकानातून चोरट्याने गणपतीची मुर्ती लंपास केली आहे. सहज दुकानामध्ये येत, कोणालाही कसलाच मागोवा न देता चोरट्याने सुमारे १५ किलो वजनाची पितळेची गणपतीची मूर्ती चोरून नेली आहे. दुकानातील CCTV कॅमेऱ्यातील व्हिडिओमध्ये, परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू असताना चोरट्याने प्रवेश केला. दुकानातील कर्मचाऱ्यांचे किंवा चालकाचे लक्ष नसताना, चोरट्याने दुकानात ठेवलेली सुमारे १५ किलो वजनाची जड आणि मौल्यवान पितळेची गणेशमूर्ती अत्यंत सावधगिरीने उचलली आणि दुकानाबाहेर काढता पाय घेतला. (Viral Video)
Kalyan News: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या गणेशमूर्ती चोरीला, चोरट्याची करामत कॅमेऱ्यात कैद . .#KalyanNews #viralvídeo #Ganeshotsav2026 #CCTVVideo #prahaarnewsline #prahaarshorts pic.twitter.com/4YAssyeX5x
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) September 8, 2026
घटनेनंतर दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती दुकानात येऊन मूर्ती चोरताना व ती घेऊन बाहेर जाताना दिसून आली. चोरीची ही संपूर्ण दृश्ये फुटेजमध्ये दिसल्याने दुकानदाराने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी परिसरातील इतर फुटेज व तपासाच्या आधारे आरोपीचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आगामी
">सणासुदीच्या काळात अशा प्रकारे भरदिवसा चोरी झाल्याने स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Ganeshotsav 2026)





