Pune Crime : लग्नाला काही महिनेच झाले... पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा आरोप अन् २५ वर्षीय नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime : ज्या वयात नव्या संसाराची स्वप्नं रंगवायची, त्याच वयात एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरात २५ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणाऱ्या कथित शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचं नाव सोनाली गोविंद पवार, वय २५, असं आहे. त्या सुतारदरा परिसरात राहत होत्या. (Pune Crime News)



सुरुवातीला सुखाचा संसार पण...


सोनाली आणि गोविंद यांचं लग्न काही महिन्यांपूर्वीच झालं होतं. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. मात्र, त्यानंतर सोनालीला पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. पतीचे विवाहबाह्य संबंध समोर आल्यानंतर गोविंदकडून सोनालीला शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. सततचा वाद आणि कथित छळ असह्य झाल्याने सोनालीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुतारदरा येथील राहत्या घरी सोनालीने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सोनालीचा मृत्यू झाला होता. (Pune Crime News)



पतीविरोधात गुन्हा दाखल


या घटनेनंतर सोनालीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या आधारे कोथरूड पोलिसांनी पती गोविंद पवार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, सोनालीच्या आत्महत्येमागचा नेमका घटनाक्रम आणि कथित छळाची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने परीक्षा

Pune Shivai bus fire: पुण्यात धावत्या इलेक्ट्रिक शिवाई बसला भीषण आग; 17 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात अपोलो हॉस्पिटलसमोर धावत्या इलेक्ट्रिक शिवाई बसला अचानक भीषण आग लागल्याची

जळगाव ते पानिपत विशेष रेल्वे धावणार ! भुसावळ, भोपाळसह नवी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने जळगाव ते पानिपतदरम्यान आणखी एक

Maharashtra Weather Update: पाऊस की उकाडा? महाराष्ट्रातील हवामानाचा ताजा अंदाज

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या

ST Bus Fare Hike: सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा! परिवहन मंत्र्यांचा भाडेवाढीला नकार...

मुंबई: एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी आणि परिवहन मंत्र्यांनी सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा दिला आहे. सध्या

एसटी महामंडळाला दिलासा देणारी बातमी, दिवाळी गोड होण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार

मुंबई: दिवाळीसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून