Thursday, September 10, 2026

Goregaon Patra Chawl : गोरेगाव पत्राचाळीत परिसरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव फेटाळला

Goregaon Patra Chawl : गोरेगाव पत्राचाळीत परिसरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव फेटाळला

सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव फेरविचारसाठी पाठवला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगावमधील वादग्रस्त पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडाच्यावतीने पूर्ण करण्यात आले असून यावरील उद्यानाचे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला. गोरेगावमध्ये मोकळ्या आरक्षित भूखंडांची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्यानांसह मोकळ्या जागांची आवश्यकता असताना अशाप्रकारचे आरक्षण रद्द करणे योग्य नसल्याचे सांगत हा प्रस्ताव सुधार समितीत फेरविचारासाठी पाठवून देण्यात आला आहे.

सुधार समितीच्या बैठकीमध्ये म्हाडा प्राधिकरणाच्यावतने उद्यान व मैदानासाठी आरक्षित असलेला गोरेगाव सिध्दार्थ नगर, पत्रा चाळ येथील म्हाडा वसाहतीतील मधून आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी पुकारला असता भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी येथील भूखंड उद्यान व मैदानासाठी राखीव असून त्याचा वापर निवासी करण्यासाठी आरक्षण बदलाचा हा प्रस्ताव आहे. गोरेगाव परिसरात ३३ हेक्टर मोकळ्या जागांची आवश्यकता असून त्यात जर या आरक्षित भूखंडाचे आरक्षण रद्द केल्यास योग्य ठरणार नाही. येथील जनता मोकळ्या जागांना मुकणार असा सवाल करत याला आपला विरोध असून हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी केली.

यावर उबाठाचे सचिन पडवळ यांनी याचे समर्थन करताना आज आपल्याला मोकळ्या जागांबाबत उपरती झाली असली ही चांगली आहे. पण मोकळ्या जागांचे प्रस्ताव आल्यास आपली भूमिका कायम राहू द्या असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवून दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा