लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत खेळ, खेळाडू आणि महाराष्ट्रातील क्रीडा सुविधांसह विविध विषयांवर चर्चा झाली. शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विराटचे स्वागत केले. यावेळी लंडनमध्ये मिळालेल्या तीन पुरस्कारांबद्दल विराटने शिंदेंचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू घडावेत, यासाठी राज्यातील क्रीडा सुविधांमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत शिंदे आणि विराट यांच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाची माहिती देताना शिंदे यांनी समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, कोस्टल रोड, अटल सेतू आणि वाढवण बंदर यांचा उल्लेख केला. (Virat Kohli Eknath Shinde Meeting)
लंडन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य करून ज्ञानसाधना केलेल्या लंडनमधील ऐतिहासिक वास्तूला ...
नवी मुंबईत स्पोर्ट्स सिटी
नवी मुंबईजवळ आकारास येत असलेल्या नवीन स्पोर्ट्स सिटीमध्ये विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी विराटला दिली. या प्रकल्पाला अधिक बळ देत दर्जेदार शिक्षणासोबतच मुलांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा विराटने व्यक्त केली. (Virat Kohli Eknath Shinde Meeting)
‘खेलो इंडिया’मुळे तरुणांना प्रोत्साहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम राबवले जात असून, त्यातून दर्जेदार खेळाडू घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा स्पर्धा आणि उपक्रमांमुळे तरुणांना विविध खेळांमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे शिंदे यांनी विराटला सांगितले. (Virat Kohli Eknath Shinde Meeting)
गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डी. जे ला विरोध नाही मात्र आवाजाच्या नियमांचे ...
‘क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देण्याची इच्छा’
“क्रिकेट हे माझे सर्वस्व आहे. खेळातून निवृत्त झालो असलो तरी क्रिकेटसाठी आजही काहीतरी भरीव योगदान देण्याची इच्छा आहे,” असे विराटने शिंदे यांना सांगितले. खेळासोबतच आहार आणि फिटनेसचे महत्त्व खेळाडूंना समजावे, यासाठीही आपण प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.
यावेळी युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी उपस्थित होते. (Virat Kohli Eknath Shinde Meeting)