Mumbai Crime News : आयकर अधिकारी असल्याचे भासवून 1 कोटींची खंडणी मागितली; बनावट धाडीत खरे आयकर अधिकारीही सहभागी

अंधेरी : अंधेरीमध्ये आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर बनावट धाड टाकत तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली असून, या बनावट कारवाईत आयकर विभागातील काही खरे अधिकारीही सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आयकर निरीक्षक आणि कर सहायकासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार राजकुमार कन्डासमी (49) यांच्याकडे संतोष खोपटकर (37) हा पूर्वी चालक म्हणून काम करत होता. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर खोपटकरला नोकरीवरून काढण्यात आले होते. तसेच त्याचा सहा महिन्यांचा पगारही थकीत होता. याच कारणातून खोपटकरने कन्डासमी यांच्याबाबत त्याच्याकडे असलेल्या माहितीचा वापर करून साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.



आरोपींनी बनावट ओळखपत्रांचा वापर करून आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत कन्डासमी यांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर कन्डासमी आणि त्यांच्या पत्नीला धमकावून त्यांचे अपहरण करण्यात आले. कार्यालयातील 10 कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले आणि त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.


आयकर विभागाची कारवाई करण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी कन्डासमी यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी खोपटकरसह विनय मोरे, प्रेम सबनानी, प्रज्ञा माईन, रेश्मा वारंग आणि सबीना शेख यांना अटक केली होती.


चौकशीदरम्यान आयकर निरीक्षक सुरेश महावीरप्रसाद मिश्रा (57), कर सहायक सुनील मनोहर गोरे (59), जितु ऊर्फ जितेंद्र नामदेव मोरे (52) आणि अशोक विठोबा शिंदे (57) यांचा सहभाग समोर आला. त्यानंतर या चौघांनाही अटक करण्यात आली.


बनावट धाडीत आयकर विभागातील अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय होती, या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि अटक आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा अंधेरी पोलीस तपास करत आहेत.


Comments
Add Comment

कॉम्प्युटर प्रिंटलाही लाजवेल असं हस्ताक्षर! नेपाळच्या प्रकृती मल्लाची जगभर चर्चा

आजकालच्या या फास्ट युगात पेनपेक्षा मोबाईल आणि कीबोर्ड जास्त हाताळले जातात. मुलं भराभर टायपिंग करतात, पण जेव्हा

WTC 2027: ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यातील निकाल न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा! भारतावर असा होणार परिणाम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता चुरशीची लढाई आहे. या स्पर्धेत एकूण नऊ संघ होते.

500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचा महायुतीच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान चालवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, साडे सात तासानंतर सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9.30 च्या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य

युएईच्या किनाऱ्यावर तेलाचे लोट; सागरी पर्यावरणाला मोठा धोका, अनेक समुद्रकिनारे बंद

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सागरी पर्यावरणाला बसू लागला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE)

प्रेतासोबत 12 तासांचा प्रवास! गीतांजली एक्स्प्रेसमध्ये कँसरग्रस्त यात्रेकरूचा मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार, तक्रार केली पण...

जमशेदपूर: भारतीय रेल्वेचं निर्ढावलेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मुंबई सीएसएमटी- हावडा गीतांजली