पुणे: सणासुदीच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या FDA कडून धडक कारवाई केली जात आहे. आता अशातच पुण्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून FDA ने चार ट्रक पनीर आणि खवा जप्त केला आहे. FDA ने केलेल्या ह्या बेधडक कारवाईची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. ह्या कारवाईमुळे राज्यातील दूध डेअरी चालकांचे चांगले धाबे दणाणले आहेत.
9/11 Attack : 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आठवले स्वामी विवेकानंद; सहिष्णुतेचा संदेश पुन्हा चर्चेत
नवी दिल्ली : अमेरिकेतील 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना 25 वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद ...
पुण्यातील बुधवार पेठेमध्ये झालेल्या कारवाईमध्ये FDA मधील मोठ्या प्रमाणावर अधिकारी वर्ग उपस्थित होता. FDA च्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यानंतर तात्काळ पोलिस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्त्रोताबाबत तपास सुरू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सणासुदीचे दिवस सुरू आहेत, याच पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई राबवली जात आहे. गणेशोत्सवात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रशासनाकडून भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News : आयकर अधिकारी असल्याचे भासवून 1 कोटींची खंडणी मागितली; बनावट धाडीत खरे आयकर अधिकारीही सहभागी
अंधेरी : अंधेरीमध्ये आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर बनावट धाड टाकत तब्बल 1 कोटी रुपयांची ...
दरम्यान, FDA प्रशासनाने अलिकडेच नाशिक जिल्ह्यातही धडक कारवाई केली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोकणगावातील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्ट नावाच्या कंपनीवर कारवाई केली आहे. कंपनीने फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प आणि क्रीमरचा एकूण 6457 किलो साठा जप्त करत कारवाई केली आहे. अन्न- औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 39 लाख 18 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न पदार्थ मिसळयुक्त आणि कमी दर्जाचे असल्याच्या संशयातून FDA प्रशासनाने कारवाई केली होती. दरम्यान, पदार्थांच्या लेबलवर Use by Date, Nutritional Information, Packing Date आणि FSSAI License Number न आढळल्यामुळे प्रोडक्ट्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती
&t=3s">एफडीएकडून देण्यात आली आहे.