
आजकालच्या या फास्ट युगात पेनपेक्षा मोबाईल आणि कीबोर्ड जास्त हाताळले जातात. मुलं भराभर टायपिंग करतात, पण जेव्हा वहीवर पेन चालवायची वेळ येते, तेव्हा अक्षर इतकं खराब येतं की वाचायलाच नको वाटतं. पण अशा या डिजिटल जमान्यात नेपाळच्या एका १४ वर्षांच्या मुलीने संपूर्ण जगाला आपल्या एका साध्या गुणाने थक्क करून सोडलं आहे. प्रकृती मल्ला असं या मुलीचं नाव असून तिचं हस्ताक्षर इतकं सुंदर आणि परफेक्ट आहे की पहिल्या नजरेत कोणालाही वाटेल ही कोणतीतरी कॉम्प्युटर प्रिंट असेल!
प्रकृती नेपाळमधील बिरेंद्र सैनिक आवासीय महाविद्यालयात शिकते. शाळेत असताना तिने इंग्रजीचा एक साधा गृहपाठ केला होता. तिचं ते पान पाहिल्यानंतर आधी तिचे शिक्षक आणि वर्गमित्र अक्कलशून्य झाले. एकाच आकाराची अक्षरे, दोन शब्दांमधलं मोजूनमापून ठेवलेलं अंतर आणि ओळींचा कमालीचा समतोल पाहून कोणाचाच डोक्यावर विश्वास बसत नव्हता. कोणीतरी तो फोटो सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. लोकांनी तर सोशल मीडियावर थेट मागणी केली की या मुलीच्या अक्षराचा कम्प्युटरसाठी एखादा खास फॉन्ट तयार केला पाहिजे! बस, तिथूनच तिला 'जगातलं सर्वात सुंदर हस्ताक्षर असलेली मुलगी' म्हणून ओळख मिळाली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान चालवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत वादावर ...
प्रकृतीची ही कला फक्त सोशल मीडियापुरतीच राहिली नाही. डिसेंबर २०२२ मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी तिने तिथल्या लोकांना आणि नेत्यांना शुभेच्छा देणारं एक सुंदर पत्र आपल्या स्वतःच्या हाताने लिहून नेपाळमधील युएई दूतावासात दिलं. तिथेही तिच्या या सुंदर अक्षराची दखल घेण्यात आली आणि तिचा विशेष गौरव करण्यात आला. असं सुंदर अक्षर काढणं ही फक्त निसर्गाची देणगी नाही, तर त्यामागे तिची वर्षानुवर्षे असलेली शिस्त आणि सराव आहे. तिच्या अक्षरांमध्ये कोणतीही अवघड डिझाईन किंवा फाटे नाहीत, तर एक साधा गोडवा आणि स्पष्टपणा आहे. तिची वही वाचताना एखाद्या छापील पुस्तकाची पाने चाळल्यासारखं वाटतं.
आजच्या काळात टाईप केल्यामुळे वेळ वाचतो हे नक्कीच, पण हाताने लिहिलेल्या अक्षरांमध्ये जो जिव्हाळा आणि माणसाचा स्पर्श असतो, तो मशीनच्या फॉन्टमध्ये कधीच येऊ शकत नाही. प्रकृतीने कसलीही प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न न करता केवळ आपल्या पेन आणि कागदाशी प्रामाणिक राहून हे यश मिळवलं आहे. आजकाल जग जितकं रोबोटिक आणि डिजिटल होत चाललंय, तितकंच माणसाच्या साध्या हातातील कौशल्य किती भारी असू शकतं, हे प्रकृतीने सिद्ध करून दाखवलं आहे.





