Lalbuagcha Raja First Look 2026 : 'लालबागचा राजा'चं प्रथम दर्शन; मिनाक्षी मंदिराचा भव्य देखावा आणि डोळे दिपवणारा राजेशाही थाट

यंदा चांदीच्या नक्षीदार दरबारात राजा विराजमान


मुंबई : जगभरातील कोट्यवधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबागच्या राजा'चे प्रथम दर्शन आज अधिकृतपणे घडले असून, गणेशोत्सवापूर्वी परंपरेनुसार प्रसारमाध्यमांसाठी विशेष फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले होते. राजाच्या या पहिल्या दर्शनासोबतच अवघ्या मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आले आहे.


भव्य देखावा आणि राजेशाही दरबार


यंदा लालबागच्या राजाचा दरबार कसा सजणार, याबाबत भक्तांमध्ये मोठी उत्सुकता होती. यंदा राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध मदुराई येथील 'मिनाक्षी अम्मन मंदिरा'ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रवेशद्वारावर भगवान महादेवाची नयनरम्य प्रतिमा बसवण्यात आली असून, ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. राजाचा गाभारा आणि मुख्य दरबार अत्यंत देखण्या अशा चांदीच्या कलाकुसरीने आणि नक्षीकामाने सजवण्यात आला आहे. या नक्षीकामामुळे संपूर्ण दरबाराची भव्यता आणि राजेशाही थाट अधिकच खुलून दिसत आहे.


सिंहासनारूढ वात्सल्य मूर्ती


रत्नांचा मुकुट, राजेशाही वस्त्रे आणि अथांग वात्सल्य असलेले डोळे... लालबागच्या राजाची सिंहासनारूढ मूर्ती पाहताच उपस्थित भाविक भारावून गेले. भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या या राजाचे मुखदर्शन होताच अनेकांचे डोळे आनंदाने पाणावले.


उत्सवाची लगबग सुरू


गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत देश-विदेशातून कोट्यवधी भाविक राजाच्या 'चरणस्पर्श' आणि 'मुखदर्शना'साठी तासन्‌तास रांगेत उभे राहतात. मंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज झालेल्या पहिल्या दर्शनामुळे लालबाग-परळ परिसरात आतापासूनच उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण परिसर 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

Comments
Add Comment

Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे.

Virat Kohli Eknath Shinde Meeting : ‘क्रिकेट माझं सर्वस्व...’; विराट कोहलीने एकनाथ शिंदेंसमोर व्यक्त केली मनातील मोठी इच्छा

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ganeshotsav : मूर्तिच्या आकारापेक्षा भक्ती महत्वाची

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डी. जे ला

Eknath Shinde London Visit : लंडनमधील बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वास्तूला एकनाथ शिंदेंची भेट; ज्ञानसाधनेच्या स्मृतींना उजाळा

लंडन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य करून ज्ञानसाधना केलेल्या

72nd National Film Awards : ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातमध्ये; दिल्लीची परंपरा मोडणार? परेश रावल म्हणाले...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा यंदा प्रथमच

Haivan Movie : ‘हैवान’मध्ये अक्षय-सैफ आमनेसामने; ताकद की चातुर्य, कोण ठरणार वरचढ?

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील थ्रिलर चित्रपट अनेकदा त्यांच्या अनपेक्षित वळणांसाठी (twists) आणि गूढतेसाठी ओळखले