Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नासाठी वारंवार फोन करून त्रास देणे आणि घरात घुसून धमक्या देण्याच्या प्रकाराला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या १० तासांत संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर...
पोलिसांच्या माहितीनुसार, निंभोरा येथील रहिवासी करण अनिल वाघ हा तरुण गेल्या काही दिवसांपासून संबंधित तरुणीला वारंवार फोन करून लग्नासाठी तगादा लावत होता. केवळ फोनवरूनच नव्हे, तर तो तरुणीच्या घरी जाऊनही तिला धमकावत असल्याचा आरोप आहे. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही,” अशा शब्दांत तो तिच्यावर दबाव टाकत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.या सततच्या छळामुळे आणि धमक्यांमुळे तरुणी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
Yavatmal Accident : यात्रा म्हटली की पाळणे आलेच. अनेकांना या रंगेबेरंगी, मोठमोठ्या पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही पण याच पाळण्यामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर ...
मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल
करण वाघ याच्याकडून होणारा कथित मानसिक छळ असह्य झाल्याने तरुणीने बुधवारी रात्री गोंदेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संशयिताच्या वर्तनाविरोधात संतापही व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. मृत तरुणीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी करण अनिल वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दहा तासांत निंभोरा येथून करण वाघला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी
सोयगाव पोलिसांनी शुक्रवारी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तरुणीला आणखी कोणत्या प्रकारे त्रास देण्यात आला होता का, धमक्यांमागील नेमकं कारण काय होतं आणि या प्रकरणात आणखी काही तथ्ये आहेत का, याचा सखोल तपास सोयगाव पोलीस करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांचा तपास सुरू असून, संशयित आरोपीवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे