नवी दिल्ली: भारत आणि चीन दरम्यानचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेनिमित्त चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीमध्ये काही तासांपूर्वी दाखल झाले आहेत. त्या पूर्वीच दोन्हीही देशाचे संबंध सुधारताना दिसत आहेत. तब्बल ६ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर, दोन्हीही देशा दरम्यानची विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत- चीन दरम्यान विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयामुळे दोन्हीही देशांतील संबंध आणखीन सुधारण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल; पंतप्रधान मोदींसोबत आज महत्त्वाची द्विपक्षीय बैठक
नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आज ...
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, चायना सदर्न एअरलाइन्सने २१ सप्टेंबरपासून ग्वांगझू- नवी दिल्ली दरम्यान नियमित थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. चायना सदर्न एअरलाइन्सकडून ह्या नव्या विमानसेवेची शनिवारी घोषणा करण्यात आली आहे.जवळपास सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या ह्या सेवेमुळे दोन्ही देशांमधील प्रवास, व्यापार आणि लोकांमधील संपर्क वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत भारत आणि चीन दरम्यानचे अनेक हवाई मार्गही पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
BRICS Summit 2026 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात; पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकीत 'या' क्षेत्रांवर भर
दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले असून, ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासोबतच ते पंतप्रधान ...
एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, या सेवेमुळे सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत- चीन दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. चायना सदर्न एअरलाईन्सकडून भारत- चीन दरम्यान, दिवसाला ८ वेळा आणि दर आठवड्याला १०० हून अधिक विमानसेवा चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी, एप्रिल महिन्यात 'एअर चायना' एअरलाईन्सकडून बीजिंग- दिल्ली आणि 'चायना ईस्टर्न' एअरलाईन्सकडून कुन्मिंग- कोलकाता सेवा सुरू केली होती. तसेच भारतीय विमान कंपनी इंडिगो कंपनीनेही कोलकाता- शांघाय सेवा सुरू करत हवाई वाहतूक अधिक मजबूत केली आहे. भारत- चीन यांच्यातील कनेक्टिव्हिटी विस्तारत असल्यामुळे दोन्हीही देशामध्ये आर्थिक, व्यापार आणि पर्यटन संबंधांना नवी चालना मिळू शकते.
ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत दाखल झाले असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. या परिषदेदरम्यान शी जिनपिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही होणार आहे.