Amruta Fadnavis : सणासुदीचा विचार करून माझे भाऊ योग्य तेच करतील; अमृता फडणवीस यांना जरांगेंबद्दल विश्वास

अहिल्यानगर प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून, राज्य सरकार यावर गांभीर्याने काम करत आहे. सध्याचे सणावारांचे दिवस लक्षात घेऊन माझे भाऊ जे करायचंय ते शांतीपूर्वक करतील, लवकरच या प्रश्नातून मार्ग निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्या माध्यमांशी बोलत होत्या.(Amruta Fadnavis)



यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाल्या, की सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सर्वांनी शांतता राखावी आणि शांततेच्या मार्गानेच विचार करावा. सरकार मराठा आरक्षण विषयावर मार्ग काढण्याच्या दिशेने सकारात्मक काम करत असून, येत्या काही दिवसांत मिळून-मिसळून यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज पुहा फडणवीस यांनी जरांगे पाटील यांचा उल्लेख भाऊ असा केला.(Amruta Fadnavis on Manoj Jarange)



या दौऱ्याप्रसंगी धनश्री विखे, आमदार संग्राम जगताप, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.(Amruta Fadnavis on Manoj Jarange)

Comments
Add Comment

Modak Mahotsav 2026 : मुंबईकरांसाठी गोड बातमी! बाप्पाच्या नैवेद्याची चिंता नको; आता मुंबईकरांना मिळणार घरपोच उकडीचे अन् तळलेले मोदक

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु होणारच आहे; तेवढ्यातच आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. या गणेशोत्सवात

Swarved Mahamandir Bhiwandi : भिवंडीतील गणेशोत्सवात साकारणार वाराणसीच्या 'स्वरवेद महामंदिर धाम'ची १२० फूट उंच भव्य प्रतिकृती

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध वाराणसी येथील 'स्वरवेद महामंदिर धाम'ची (Swarved Mahamandir Dham) सुमारे १२० फूट उंच आणि

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नासाठी तगादा, फोनवरून छळ अन् घरात जाऊन धमक्या ! मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नासाठी वारंवार फोन करून त्रास देणे आणि घरात घुसून धमक्या देण्याच्या प्रकाराला कंटाळून १९

Mumbai Ganpati 2026 : गणपती उत्सवापूर्वी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; सुरक्षिततेचा उपाय म्हणून मशीद आणि माटुंगा येथील चार पादचारी पूल बंद होणार

मुंबई:

Mira Road School : विद्यार्थ्यांवर खानपान सक्ती लादणाऱ्या मीरारोडमधील शाळेला दणका

- शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस; पर्युषण काळात डब्यात कांदा, लसूण, बीट न आणण्याच्या सूचना मुंबई : पर्युषण

Ameesha Patel : अमीषा पटेलला लाखोंचा फटका! आईच्या घरातून डायमंड ब्रेसलेट गायब; तपासात हाऊस हेल्पर अटकेत

मुंबई : ‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि सुपरहिट