Saturday, September 12, 2026

Mary Kom : अभिमान की अहंकार? सानिया-सायनाचा उल्लेख होताच मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासारखं कुणी...’; नेमकं काय घडलं?

Mary Kom : अभिमान की अहंकार? सानिया-सायनाचा उल्लेख होताच मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासारखं कुणी...’; नेमकं काय घडलं?
मुंबई : ‘बिग बॉस २०’मध्ये मेरी कोमच्या कारकिर्दीचा आणि तिच्या यशाचा उल्लेख होत असतानाच तिच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काझी तौकीर यांच्यासोबतच्या संवादात भारतीय महिला खेळाडूंचा उल्लेख होत असताना मेरी कोमने आपल्या सहा विश्वविजेतेपदांचा दाखला दिला. तिच्या या विधानानंतर काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, इतर महिला खेळाडूंच्या यशाचाही सन्मान व्हायला हवा, असं मत व्यक्त केलं. तर काहींनी मेरी कोमची ऐतिहासिक कामगिरी लक्षात घेता तिच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये, असंही म्हटलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. (Mary Kom) मेरी कोमसोबत संवाद साधताना काझी तौकीरने भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंची नावे घेतली. यामध्ये त्यांनी सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल यांचा उल्लेख केला. त्यावर मेरी कोमने मध्येच हस्तक्षेप करत, “लेकिन मेरे जैसा कोई हासिल नहीं किया,” असे म्हटले. यानंतर तिने आपल्या सहा विश्वविजेतेपदांचा उल्लेख केला. (Mary Kom)
 
View this post on Instagram
 

A post shared by Dr MC Mary Kom (@mcmary.kom)

मेरी कोमच्या या वक्तव्यावर काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. काहींच्या मते, स्वतःच्या कामगिरीचा अभिमान असणे स्वाभाविक असले तरी इतर खेळाडूंच्या यशाला कमी लेखणे योग्य नाही. काहींनी मेरीच्या वक्तव्याला ‘अहंकार’ किंवा ‘आत्ममग्नता’ असे संबोधले, तर काही प्रेक्षकांनी तिच्या संपूर्ण कारकिर्दीतील योगदानाचा आदर व्यक्त करत तिच्या वक्तव्यावर मात्र प्रश्न उपस्थित केले. (Mary Kom) एका युझरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, मेरी कोमने इतर खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून स्वतःला सर्वश्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला. तर आणखी एका प्रेक्षकाने तिच्या कामगिरीचा आदर असल्याचे सांगत, इतर भारतीय खेळाडूंचाही सन्मान केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, मेरी कोमच्या ऑलिम्पिक कामगिरीची तुलना पी. व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांच्या कामगिरीशीही काही प्रेक्षकांनी केली. मेरी कोमने लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते, तर पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत. मीराबाई चानूने टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. त्यामुळे मेरी कोमच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (Mary Kom)

मेरी कोमची शानदार कारकीर्द...

मेरी कोम ही भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला बॉक्सरपैकी एक आहे. तिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विक्रमी सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये ५१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला बॉक्सर ठरली. याशिवाय मेरी कोमने २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले. भारतीय क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाची दखल घेत तिला राजीव गांधी खेलरत्न (आताचा मेजर ध्यानचंद खेलरत्न), अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. (Mary Kom) त्यामुळे मेरी कोमच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद सुरू असला, तरी भारतीय बॉक्सिंग आणि क्रीडा क्षेत्रातील तिचे योगदान निर्विवादपणे उल्लेखनीय राहिले आहे. (Mary Kom)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >