मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता ह्या बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. रोखठोक व्यक्तिमत्व आणि स्पष्ट बोलणं यामुळे चर्चेत राहणाऱ्या नीना गुप्ता सध्या त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणाऱ्यांवर ट्रोलर्सना स्पष्ट प्रत्युत्तर दिलं आहे. नीना गुप्ता यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी गरोदर असल्याचं सांगितलंय, त्यांच्या ह्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. त्यांच्या ह्या विचित्र वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विचित्र वक्तव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता नीना यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Marathi Actor Facebook Post : 'I am committing Suicide'....मराठी अभिनेत्याने फेसबुक पोस्ट टाकली अन् खळबळ उडाली, पोलिसांनी...
Marathi Actor Facebook Post : एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या फेसबुक पोस्टने त्याच्या चाहत्यांसोबत पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण फेसबुक पोस्ट खळबळ उडवणारीच ...
'सीएनएन- न्यूज 18' (CNN- News 18) ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांना " तुम्ही लग्न कधी करणार? अशा प्रश्नांना तुम्ही कशापद्धतीने सामोरं जातात? अशा प्रश्नांना तुम्ही कशी उत्तरं देतात?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना जरा स्पष्टच उत्तर दिलं आहे, त्या म्हणाल्या की, “मी कोणाच्याही घरचं खात नाही, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही लग्न झालंय किंवा नाही झालंय याचा मला काय फरक पडणार आहे? दुसऱ्याच्या आयुष्यातील निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं समजणाऱ्या लोकांना मी तर अजिबात सहन करत नाही.”
72nd National Film Awards : ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातमध्ये; दिल्लीची परंपरा मोडणार? परेश रावल म्हणाले...
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा यंदा प्रथमच गुजरातमधील केवडिया (एकता नगर) येथे आयोजित ...
वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांसोबतचा नीना गुप्ता यांनी एक किस्सा शेअर केला आहे. त्या म्हणाल्या, “मी एकदा साडी नेसले होते आणि ती जरा सैल झाली होती. त्यामुळे ती साडी जरा कमरेजवळ फुगल्यासारखी वाटत होती. त्यामुळे लगेचच मला अनेकांनी माझ्या वजनावरून प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. माझं वय ६० आहे आणि लोक मला विचारत होते, मी गरोदर आहे का? तेव्हा मी माझ्या टीमला सांगितलं की, खरंच त्यांना सांगा की, हो, मी खरंच गरोदर आहे. म्हणून मी प्रत्येकाला सल्ला देते की, जर तुमच्या कोणी शरीरावरून कमेंट करत असेल तर त्यांना सांगून टाका की, हो मी खरंच प्रेग्नंट आहे.” अभिनेत्रीच्या ह्या चर्चेची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा होताना दिसत आहे.