मुंबई : ‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे अमीषाने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे देशभरात असंख्य चाहते आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त अमीषा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. (Ameesha Patel)
दरम्यान, अमीषाच्या कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमीषाच्या आईच्या घरातून हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरीच्या या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू आहे. (Ameesha Patel)
मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता ह्या बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. रोखठोक व्यक्तिमत्व आणि स्पष्ट बोलणं यामुळे चर्चेत राहणाऱ्या नीना गुप्ता ...
माहितीनुसार, अमीषाची आई आशा पटेल यांच्या घरातून लाखो रुपयांचं हिऱ्याचं कंगन चोरीला गेलंय. तसंच पोलिसांनी घरातील एक हाऊस हेल्परला अटक केलीय. ती आरोपी महिला विरार इथली रहिवाशी असून तिचं नाव सीमा विनोद घाटे असं आहे. गेल्या दीड वर्षांपासून ती आशा पटेल यांच्या घरी काम करते. (Ameesha Patel)
आशा पटेल यांच्या घरातून जानेवारीमध्ये ५ लाख रुपयांचं डायमंड जडित कंगन चोरीला गेलं होतं. त्यानंतर चोरीमध्ये मात्र सीमा हिचा असल्याचा आशा पटेल यांचा संशय होता. त्यांनी तिची चौकशी केली, परंतु तिने चोरी केली नसल्याचं सांगितलं. यानंतर आशा पटेल यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३०६ अंतर्गत या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली.
पोलिसांच्या तपासादरम्यान सीमा घाटे हिचा शोध घेत तिला विरारमधून ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करत १५ सप्टेबरपर्यंतची कोठडी सुनावली आहे. परंतु चोरीला गेलेले दागिने अद्याप पोलिसांना परत मिळाले नसून तपास सुरु आहे. (Ameesha Patel)






