मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी १३ सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा जारी केला आहे. (Thane Rain Alert)
हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासांत या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याचीही शक्यता आहे. (Thane Rain Alert)
गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच हा पाऊस होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
मुंबई: लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहोत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त रात्री सुद्धा गणरायाचे ...
पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने धोकादायक ठिकाणी थांबू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Thane Rain Alert)
तसेच कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनानेही आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. (Thane Rain Alert)






