मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता राज्यातील हवामानात पुन्हा बदल होण्यास सुरुवात झाली असून पावसासाठी पोषक हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 12 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
कोकण विभागात आज यलो अर्लट
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. (Yellow Alert)
कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर पुन्हा नांदणीत परतली आहे. गुजरातमधील ...
उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, धुळे आणि नंदुरबारसाठी पुढील दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा आणि सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीला अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही आहे. ( Weather Update)
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather pdate)
एकूणच, राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून पुढील दोन दिवस अनेक भागांत पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.





