पिंपरी चिंचवड: अलीकडेच सोशल मीडियावर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टेक्नॉलॉजी वापरून आरटीओ पोलिसांच्या कॅमेऱ्यांना गुंगारा देणाऱ्या ड्रायव्हरवर कारवाई केली आहे. टोयोटा फॉर्च्युनर एसयुव्ही कार चालकाच्या विरोधात ट्रॅफिक पोलिसांनी आता गुन्हा दाखल करत आता ड्रायव्हरवर कारवाई केली आहे. हायटेक टेक्नोलॉजीचा वापर करून त्या ड्रायव्हरने त्याच्या कारची नंबरप्लेट लपवली होती. त्याच आधारावर आरटीओ पोलिसांनी त्या कार चालकावर कारवाई केली आहे.
Farmer Loan Waiver Scheme 2026 : कर्जमुक्तीसाठी ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ...
व्हिडिओ व्हायरल होताच, आरटीओ पोलिसांनी दखल घेत, सापळा रचून पिंपरी चिंचवडमध्ये सापळा रचून गाडी ताब्यात घेतली आहे. शिवाय, कारचालकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ड्रायव्हरवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत बनावटगिरी, फसवणूक आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांनी त्या कारची तपासणी केल्यानंतर त्यांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. फॉर्च्यूनर चालकाने कारमध्ये, ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रोलर’ किंवा कव्हर करणारी विशेष आधुनिक यंत्रणा बसवली असल्याचे उघडकीस आले होते.
कार ड्रायव्हिंग करताना एका बटणाच्या सहाय्याने वाहनाची नंबर प्लेट झाकली जाऊ शकते, अशी रचना केली होती. त्यामुळे एक्स्प्रेसवेवरील अत्याधुनिक ट्रॅफिक कॅमेऱ्यांमध्ये वाहनाचा क्रमांक नोंदवला जात नव्हता आणि ई-चलानपासून चालकाचा सहज बचाव होत होता. त्या कार चालकाने ही यंत्रणा पंजाबमधून बसवल्याची माहिती पोलिस तपासामध्ये स्पष्ट केले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलन चुकवण्यासाठी ती मशीन बसवल्याचे कार चालकाने कबूल केले. पोलिसांनी कारवर किती इ- चलान आहेत, याची चौकशी केल्यावर फॉर्च्युनर कारवर तब्बल एक- दोन नाही तर, ५५ ई- चलान थकीत होते. याचा दंड तब्बल १ लाख ३ हजार रूपयांपर्यंत जातो..
५५ पैकी ५१ चलान फक्त ओव्हरस्पीडिंगमुळे कापण्यात आले आहेत. नो- एन्ट्रीमध्ये कार नेल्यामुळे आणखी एक चलान कापण्यात आले होते. ही यंत्रणा बसवून चालक सातत्याने वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत नियमांची पायमल्ली करत असल्याचे यावरून सिद्ध होते.
">दरम्यान, आरटीओने कार चालकाकडून या आठवड्याच्या सुरूवातीला वाहनासंदर्भात ४,५०० रुपयांचा दंड आकारला. सध्या पोलिसांकडून कार ड्रायव्हरची आणि कारची सुद्धा सखोल चौकशी केली जात आहे.