नवी दिल्ली: बुद्धगयेतील ऐतिहासिक महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध धर्माच्या ताब्यात असावे आणि त्याचे सर्व विश्वस्त व चेअरमन बौद्धच असावेत, या प्रमुख मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बौद्ध भिक्षू संघाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.(Ramdas Athawale)
नवी दिल्लीतील ६-ए, कृष्णा मेनन मार्ग येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत, महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.(Buddhist Community)
मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु होणारच आहे; तेवढ्यातच आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. या गणेशोत्सवात बाप्पाचे आणि सर्वांचेच आवडते मोदक घरोघरी ...
प्रमुख मागण्या आणि शिष्टमंडळ:
-
कायदेशीर दुरुस्तीची मागणी: बौद्ध धम्माचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडेच असावे, यासाठी बिहार विधानसभेच्या १९४९ च्या 'महाबोधी विहार टेम्पल ऍक्ट'मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.(Buddhist Community)
-
शिष्टमंडळातील उपस्थिती: या शिष्टमंडळात पूज्य भंते करुणानंद महाथेरो, भंते डॉ. राहुल बोधी महाथेरो, भंते थेरो ज्योती आणि भंते आनंद यांसह अनेक मान्यवर भिक्षू उपस्थित होते.
मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध वाराणसी येथील 'स्वरवेद महामंदिर धाम'ची (Swarved Mahamandir Dham) सुमारे १२० फूट उंच आणि पर्यावरणपूरक प्रतिकृती यंदा भिवंडीतील ...
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार भेट:
यापूर्वी रामदास आठवले यांनी या महत्त्वपूर्ण विषयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. पंतप्रधानांच्या सूचनेनुसारच आज या शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिल्यास देशभरातील बौद्ध बांधवांमध्ये केंद्र सरकारबाबत अतिशय सकारात्मक संदेश जाईल, असे या वेळी आठवले यांनी स्पष्ट केले.(Buddhist Community)
सकारात्मक प्रतिसादाचे आश्वासन:
आठवले यांनी मांडलेली भूमिका आणि महाबोधी महाविहाराच्या इतिहासाबाबतची सविस्तर माहिती अमित शहा यांनी अत्यंत आस्थेने ऐकून घेतली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेऊन आणि अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या वेळी अमित शहा यांनी शिष्टमंडळाला दिले.(Ramdas Athawale)






