Pune Accident : पाषाण-बावधन रस्त्यावर व्यायाम करताना कारची धडक; 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असताना इनोव्हा हायक्रॉस कारने त्यांना धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. (Pune News)


मृत व्यक्तीची ओळख वीरेंद्र राघवेंद्र प्रसाद द्विवेदी अशी झाली आहे. ते पाषाण येथील विवेकानंद सोसायटीमधील गुलमोहर प्लाझा येथे राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेकलेस गार्डन परिसराच्या जवळ झाला. (Accident News)



द्विवेदी हे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असताना भरधाव कारने त्यांना धडक दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. (Pune Accident)


या अपघातातील कार चालकाची ओळख 19 वर्षीय इशान विशाल सेठिया अशी झाली आहे. या अपघातात तोदेखील जखमी झाला आहे. अपघातात वापरलेली इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड ZX 7S कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिचा नोंदणी क्रमांक MH12YS0622 आहे.


तपासादरम्यान ही कार 'ब्लूरेज डेव्हलपर्स'च्या नावावर नोंदणीकृत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. वाहनाचा अधिकृत नोंदणीकृत पत्ता 'अबिल हाऊस' असा असल्याचेही समोर आले आहे.


अपघात नेमका कसा झाला, त्यावेळी कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याचा पोलीस तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पाषाण-बावधन रस्ता आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच चालकाची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.


या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 281 तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



Comments
Add Comment

OYO Hotel : OYO आणि लॉज चालकांनो सावधान! नियम मोडला तर थेट जेलची हवा; पोलिसांनी जारी केले नवे आदेश

नागपूर : नागपूरमध्ये OYO हॉटेल, लॉज आणि इतर हॉटेल चालकांसाठी पोलिसांनी कडक नियमावली लागू केली आहे. हॉटेलमध्ये

Sand Mining Maharashtra : वाळू लिलाव धोरणात राज्य सरकारकडून बदल

- ई-लिलावासोबत ई-निविदा पद्धत बंधनकारक; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केल्या नवीन मार्गदर्शक

Pune Traffic Update: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तीन दिवसांसाठी

Jalgaon Ganeshotsav : स्थापनेआधीच बाप्पाचं विसर्जन! ४७ हजारांची १२ फुटी गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; कार्यकर्त्यांचा मूर्तिकारावर आरोप

जळगाव : गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूरहून जळगावकडे आणली जात असलेली तब्बल १२ फूट उंचीची गणेशमूर्ती

Manoj Jarange Patil : १९ सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार - आझाद मैदानात आंदोलन; १५ सप्टेंबरला अंतरवालीहून प्रस्थान करणार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देण्याची

Maharashtra School Recruitment : अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा

- राज्य शासनाकडून आदेश जारी; मुलाखतीचे इन-कॅमेरे चित्रिकरण बंधनकारक मुंबई : राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च