Nagpur Crime : नागपुरात संशयातून भयानक हत्याकांड! सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं, पुढे जे घडलं त्याने पोलीसही हादरले

नागपुर :  नागपुरात मुलाच्या मृत्यूला आपली सूनच जबाबदार असल्याच्या संशयातून एका 70 वर्षीय सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आउट येथे हा प्रकार घडला. लक्ष्मी रविशंकर पाली (45) असे मृत महिलेचे नाव असून नत्थूलाल पाली असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. सुनेवर हल्ला केल्यानंतर आरोपीने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.



पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, नत्थूलाल यांच्या मुलाचा 2019 मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर आपल्या सुनेने जादूटोणा केल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला, असा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला होता. याच कारणावरून सासरा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून लक्ष्मी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.


शनिवारी दुपारी सुमारे 12:15 वाजता लक्ष्मी यांच्या घरातील मुलगी कामावर गेली होती, तर मुलगा घराबाहेर होता. यावेळी लक्ष्मी घराच्या मागील बाजूस कपडे धुत होत्या. त्याचवेळी नत्थूलाल यांनी मागून येत त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मी गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.



सासऱ्याची विहिरीत उडी, घटनेने पोलीसही चक्रावले


घटनेनंतर नत्थूलाल यांनी घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला विहिरीतून बाहेर काढले. फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे जमा केले आहेत. यशोधरानगर पोलिसांनी नत्थूलाल पाली याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण