मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांच्या आगमन आणि विसर्जन मार्गावर येणाऱ्या शहरातील दहा प्रमुख पुलांवर यंदाही गणेश भक्तांना काळजी घ्यावी लागणार आहे. घाटकोपरसह शहरातील दहा पुलांवर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह भाविकांना जास्त गर्दी करून किंवा वाजत गाजत मिरवणूक थांबवत नेता येणार नाही. त्यामुळे या सर्व पुलांवर वाद्ये वाजवणे थांबवून त्वरीत श्री गणरायांची मूती पुलाच्या पलिकडे न्यावी लागणार आहे. तरी गणेश भक्तांनी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या दहा पुलांवरून मिरवणूक नेताना योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन पूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (Ganeshotsav 2026)
आगमन, विसर्जन मार्गात वाहतूक नियमांचे पालन करा बृहन्मुंबई सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रींचे आगमन व विसर्जन ...
मुंबई महापालिका प्रमुख अभियंता (पूल) यांच्या माध्यमातून जुन्या व धोकादायक पुलांची माहिती जाहिर करून खबरदारीची उपाययोजना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये मध्य रेल्वेवर असलेल्या घाटकोपर रेल्वे पूल, करीरोड रेल्वे पूल, साने गुरुजी मार्ग, ऑर्थर रोड येथील चिंचपोकळी रेल्वे पूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल, भायखळा रेल्वे पूल तसेच पश्चिम रेल्वेवरील ग्रँटरोड व चर्नीरोड दरम्यान असलेल्या फ्रेंच रेल्वे पूल, केनेडी रेल्वे पूल, फॉकलँड रेल्वे पूल, महालक्ष्मी स्टेशन रेल्वे पूल, दादर टिळक रेल्वे पूल आदींचा समावेश आहे. (Ganeshotsav 2026)
डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प काम पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व ...
करी रोड स्थानकावरील पूल, साने गुरुजी मार्गावर असणारा चिंचपोकळी रेल्वे स्थानकावरील पूल आणि भायखळा परिसरातील रेल्वे मार्गावरील पां. सं. मंडलिक पूल या पुलांवर एका वेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही. म्हणजे भाविकांचे व वाहनांचे एकूण मिळून वजन हे एका वेळेस १६ टनांपेक्षा अधिक नसावे. त्यामुळे भाविकांनी काळजी घ्यावी असे पूल विभागाच्या प्रमुख अभियंता यांनी कळवले आहे. (Ganeshotsav 2026)




