Sunday, September 13, 2026

Ganeshotsav Mumbai : मुंबईकरांनो, लाडक्या बाप्पासाठी मागवा घरपोच मोदकाचा नैवेद्य; महानगरपालिकेच्यावतीने श्रीगणेशोत्सवासाठी ‘मोदक महोत्सव २०२६’

Ganeshotsav Mumbai : मुंबईकरांनो, लाडक्या बाप्पासाठी मागवा घरपोच मोदकाचा नैवेद्य; महानगरपालिकेच्यावतीने श्रीगणेशोत्सवासाठी ‘मोदक महोत्सव २०२६’

महिला बचत गटांच्या माध्यमातून १४ सप्टेंबर २०२६ पासून घरपोच मिळणार मोदक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन होत असताना त्यांच्यासाठी नैवेद्यासह पंचपंक्वाने बनवण्याची लगबग प्रत्येक घरात सुरु असते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी सगळ्यात आधी पूजेच्या ताटात मान मिळविणारा पदार्थ म्हणजे मोदक. मात्र, हा नैवेद्य कुणाला बनवता येत नाही तर कुणाला वेळच मिळत नाही. त्यामुळे यंदा महापालिकेने महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रेमाने तयार केलेले उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘मोदक महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन आर्डर करा आणि पॅकींगसह मोदकांचा नैवेद्य अ आपल्या लाडक्या बाप्पा घरबसल्या मिळवा.

मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा असून नागरिक https://shgeshop.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना १४ सप्टेंबर २०२६ पासून मोदकांचे घरपोच वितरण केले जाणार आहे. ही घरपोच वितरण सेवा केवळ मुंबईमध्ये उपलब्ध राहणार आहे. हा मोदक महोत्सव संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी केवळ एक दिवस आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने दिली आहे.(Ganeshotsav Mumbai)

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

मुंबई महानगरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी आणि त्यांना व्यवसायाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध नाविन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रम राबविण्यात येतात.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘मोदक महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार मोदक नागरिकांना उपलब्ध होणार असून, गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार असल्याची माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली. मुंबईकरांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गणरायासाठी उकडीचे आणि तळलेले मोदक घरपोच

श्रीगणेशोत्सवात मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांकडून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत उकडीचे आणि तळलेले मोदक ग्राहकांना मिळणार आहेत.कोसळले.(Ganeshotsav Mumbai)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >