मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या आनंदावर काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी गावाजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती महामार्गालगत तब्बल २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. (Mumbai Goa Highway Accident)
या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत प्रवास करणारी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (Mumbai Goa Highway Accident)
पुणे : पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या ...
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश निवृत्ती पाटील (वय २९, रा. पोलादपूर) आणि अक्षता अरविंद कवडे (रा. चिपळूण) हे दोघे दुचाकीने पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने येत होते. पहाटे ६ वाजेच्या सुमारास खवटी गावानजीक दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. (Mumbai Goa Highway Accident)
हा अपघात इतका भीषण होता की सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य करत दोघांनाही बाहेर काढले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अक्षता कवडे हिला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (Mumbai Goa Highway Accident)
मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे 13 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत 69 वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत ...
गणेशोत्सवाच्या तोंडावरच चिपळूणला येताना घडलेल्या या अपघातामुळे पोलादपूर आणि चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणच्या दिशेने रवाना झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसला. शनिवारी सकाळपासून मुंबई आणि नवी मुंबईहून कोकणाकडे निघालेल्या वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या मार्गावर माणगाव, इंदापूर आणि नागोठणे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. (Mumbai Goa Highway Accident)