Sunday, September 13, 2026

Amitabh Bachchan News: बिग बी बच्चन यांची अजूनही 'ती' एक इच्छा अपूर्णच; म्हणाले, “…याच गोष्टीचं वाईट वाटतं.”

Amitabh Bachchan News: बिग बी बच्चन यांची अजूनही 'ती' एक इच्छा अपूर्णच; म्हणाले, “…याच गोष्टीचं वाईट वाटतं.”
मुंबई: 'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या होस्टिंगची जबाबदारी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर आहे. शोमध्ये स्पर्धकांसोबत दिलखुलास गप्पा मारताना बिग बी बऱ्याचदा अनेक गोष्टींचा ते खुलासा करत असतात. अलीकडेच अमिताभ यांनी त्यांची एक इच्छा सांगितली आहे. त्या अपूर्ण इच्छेचा त्यांना आजही पश्चाताप होतो. ८४ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, त्यांना नेहमीच गाणं शिकण्याची इच्छा होती, पण त्यांना ते कधी जमले नाही. त्यांची ही इच्छा ऐकून फॅन्सला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा आणि वैयक्तिक पैलू पाहायला मिळाला.
अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान, स्पर्धकासोबत बोलताना त्यांनी त्यांच्या अपूर्ण इच्छेबद्दल सांगितले, ते म्हणाले की, “माझी इच्छा असतानाही मी कधीच गाणं शिकलो नाही. लोक खूप चांगलं गातात किंवा सतारसारखी वाद्ये वाजवतात, तेव्हा मला थोडं वाईट वाटतं. ते इतक्या चांगल्या प्रकारे कसे काय गाऊ शकतात? याविषयी मला कायमच आश्चर्य वाटते. मी कधीच हे शिकलो नाही. मी पुन्हा केव्हातरी ते वाद्य शिकेल या आशेने माझ्या घरी सगळी वाद्ये आणून ठेवली आहेत. आता मी ८४ वर्षांचा आहे आणि वाद्य वाजवण्यास मी अजूनही शिकलो नाही. त्यामुळे याच गोष्टीचं मला वाईट वाटतं.” बिग बींच्या ह्या अपूर्ण इच्छेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
हॉटसीटवर खेळताना स्पर्धकाने बिग बींना असेही विचारले की, "तुम्हाला तुमच्या आयुष्यातील असा कोणता दिवस आहे, जो पुन्हा जगायला आवडेल?" या प्रश्नावर अमिताभ बच्चन म्हणाले की, प्रामाणिकपणे सांगायचे तर माझ्या आयुष्यात इतक्या घटना आणि प्रसंग घडले आहेत की, त्यामुळे कोणता ठराविक एक दिवस निवडावा, हे ठरवणं माझ्यासाठी कठीण आहे. 'कौन बनेगा करोडपती'चा १८ वा सीझन सोनी टीव्हीवर प्रदर्शित होतोय. दर सोमवार ते शुक्रवार दरम्यान रात्री ९ वाजता हा शो टेलिकास्ट होतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा