Sunday, September 13, 2026

Hanuman Ansh Oscar: 'हनुमान अंश'ची थोडक्यात ऑस्करवारी मुकली, निर्मात्यांनी सर्व काही सांगितलं

Hanuman Ansh Oscar: 'हनुमान अंश'ची थोडक्यात ऑस्करवारी मुकली, निर्मात्यांनी सर्व काही सांगितलं
मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' चित्रपटाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान चर्चा सुरू आहे. जेमतेम २ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या ह्या चित्रपटाने महिन्याभरात २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट सर्वांसाठीच एक सरप्राईज ब्लॉकबस्टर ठरला आहे. 'नीम करोली बाबा'यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. सर्वच स्तरातून कौतुक होणाऱ्या ह्या चित्रपटाबद्दल आता निराशाजनक बातमी समोर येत आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱ्या 'हनुमान अंश' चित्रपटाला यावर्षी भारताला अधिकृत ऑस्कर नामांकन मिळालेले नाही. नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया...
'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटगरीमध्ये चित्रपटाला भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून स्थान मिळावे, अशी सोशल मीडियावर सातत्याने मागणी केली जात आहे. आता अशातच या दरम्यान, चित्रपटाची निर्माती नम्रता सिंहने या प्रकरणावर भाष्य केले आहे. चित्रपट पाठवण्याची अंतिम मुदत उलटून गेल्याची माहिती नम्रता सिंहने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. येत्या १८ सप्टेंबरला 'हनुमान अंश' चित्रपट तेलगु भाषेमध्ये डब करून रिली करण्यात येणार आहे. त्याच चित्रपटाची सध्या प्रॉडक्शन टीमकडून तयारी सुरू आहे. इतकेच नाही, तर या चित्रपटावर आधारित एक गेम आणि एक कॉमिक बुकदेखील लॉन्च करण्यात येणार आहे.

चित्रपट ऑस्करला का नाही जाऊ शकला?

निर्माती नम्रता सिंगने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "चित्रपट ऑस्करसाठी का सादर केला नाही, असं अनेकांनी मला फोन करून विचारलं. माझी टीम खूप लहान असल्यामुळे एकाच वेळी आम्ही अनेक कामे सांभाळत आहोत. चित्रपट पाठवण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर होती. चित्रपटाच्या टीमला ऑस्करच्या शेवटच्या तारखेबद्दल माहित नव्हतं. सध्या टीम एक- एक करून आवश्यक कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तेलगूसह तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्येही हा चित्रपट डब करण्याचे काम सध्या सुरू आहे. दिव्यांग व्यक्तींना सुद्धा हा चित्रपट सहज पाहता यावा यासाठीही काम सुरू आहे. चित्रपटाचे कलाकार आणि दिग्दर्शकही प्रमोशन आणि इतर कामांसाठी विविध ठिकाणी प्रवास करत आहेत, त्यामुळे ऑफिसमध्ये जास्त लोक उपस्थित नसतात."
"चित्रपट जगभरात रिलीज करणं हे माझ्यासाठी आणि टीमसाठी फार आव्हानात्मक आहे. परदेशात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अनेक नियम आणि कार्यपद्धतींचे पालन करावे लागते. हा चित्रपट माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता, कारण मी पहिल्यांदाच चित्रपटाची निर्मिती करत होती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी हे सुद्धा पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. त्यामुळे आम्ही दोघेही आणि आमची टीमसुद्धा प्रत्यक्ष कामातूनच चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याची प्रक्रिया शिकत आहेत. सेन्सॉरशिपची प्रक्रिया आणि परदेशी प्रदर्शनासाठी आवश्यक सामग्री तयार करणे हे देखील आव्हानात्मक होते. ११ सप्टेंबर ही तारीख टीमसाठी महत्त्वपूर्ण होती. त्याच दिवशी नीम करोली बाबांची महासमाधी असते.मी स्वतः बाबांची भक्त असल्यामुळे मला निर्माती म्हणून हा चित्रपट त्याच विशेष दिवशी परदेशात प्रदर्शित करायचा होता." नम्रता सिंगने दिलेल्या माहितीनुसार, "11 सप्टेंबर ह्या रिलीज डेटसाठी प्रॉडक्शन टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि अखेरीस चित्रपट साकार झाला. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ९.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता टीम चित्रपटाची कथा जगभरात विस्तारण्याची तयारी करत आहे. ज्या कंपनीने लोकप्रिय गेम 'FAU-G' तयार केला होता, तीच कंपनी या चित्रपटावर आधारित एक व्हिडिओ गेम तयार करत आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटाच्या कथेवर आधारित कॉमिक बुक तयार करण्याची तयारी सुरू आहे. देशातील एका प्रमुख कॉमिक बुक प्रकाशकाशी चर्चा सुरू आहे. 'हनुमान अंश पार्ट २' या दुसऱ्या भागाबाबतही चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार, सिक्वेलमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कॅमिओची शक्यता वर्तवली जात आहे. पण, निर्मात्यांनी अद्याप या वृत्तांना अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >