Wednesday, October 28, 2026

WPL 2027 Auction Live: वुमन्स प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वासाठी लागणार बोली, सर्व अपडेट एका क्लिकवर

WPL 2027 Auction Live Update: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पाचव्या हंगामापूर्वी स्पर्धेतील 27 जागांसाठी बोली लागणार आहे. एकूण 150 खेळाडू या लिलाव प्रक्रियेत आहे. यात 122 भारतीय, तर 28 विदेशी खेळाडू आहे. 2026 पर्वापूर्वी झालेल्या मेगा लिलावादरम्यान प्रत्येक संघात मोठे फेरबदल करण्यात आले होते. आता संघ त्या उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करतील.

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी यशस्वी ठरल्या आहेत. या दोन्ही फ्रेंचायझींनी प्रत्येकी दोन जेतेपद मिळवले आहेत. तर युपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजराज जायंट्स या फ्रेंचायझींच्या पदरी निराशा पडली आहे. यूपी वॉरियर्ससाठी 2026 चा हंगाम खूपच वाईट गेला. त्यामुळे फ्रेंचायझीने आपल्या संघातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. श्वेता सेहरावत, किरण नवगिरे आणि डिएन्ड्रा डॉटिन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना संघाने करारमुक्त केले आहे. आता पर्समध्ये 3 कोटीहून अधिकची रक्कम असून मोठी बोली लावण्याची संधी आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >