नवी दिल्ली: अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) नुकतीच काही अतिसंवेदनशील गुप्त कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत, ज्यातून एक मोठा खुलासा समोर आला आहे. अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन ज्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणू इच्छित होता, त्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होता. ही माहिती १९९८ मधील एका 'प्रेसिडेंशियल डेली ब्रीफ' मधून उघडकीस आली आहे.(CIA secret files)
- मंत्री नितेश राणे यांचा घणाघात; शिवरायांचे मावळे हिंदू सणांमध्ये कधीही अडचणी आणणार नाहीत मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच लागू करण्यात आलेल्या ...
२५ व्या वर्धापन दिनानिमित्त कागदपत्रे सार्वजनिक
२००१ मधील ९/११ (9/11) दहशतवादी हल्ल्यांच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सीआयएने ओसामा बिन लादेनशी संबंधित ७० हून अधिक प्रेसिडेंशियल इंटेलिजन्स ब्रीफ सार्वजनिक केले आहेत. यामध्ये १०० हून अधिक पानांची माहिती समाविष्ट आहे. २८ ऑगस्ट १९९८ रोजीच्या एका ब्रीफनुसार, बिन लादेनला जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये हल्ले घडवायचे होते. या यादीत भारतासोबतच पाकिस्तान, इजिप्त, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन, युगांडा आणि नायजेरियाचा उल्लेख असल्याचे आढळले आहे.(CIA secret files)
भारताबाबत अचूक माहिती नाही
‘बिन लादेनचे दहशतवादी नेटवर्क अजूनही धोका आहे’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या दस्तऐवजातील काही भाग अद्यापही गोपनीय ठेवण्यात आला असून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. भारताबाबत यात कोणतीही विशिष्ट ठिकाणे, हल्ल्याची तारीख किंवा अचूक ऑपरेशनल प्लॅनची माहिती देण्यात आलेली नाही.(CIA secret files)
Nalasopara West : ...
अनेक देशांमध्ये होते नेटवर्क
दस्तऐवजात नमूद केल्यानुसार, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्तानात आतंकवादविरोधी कारवाई करूनही लादेनचे नेटवर्क पूर्णपणे नष्ट झाले नव्हते. त्याची संपर्क व्यवस्था अजूनही कार्यरत होती. लादेन किमान ६० देशांमध्ये पसरलेल्या व्यक्ती आणि सहयोगी दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कचा वापर करून अमेरिका, ब्रिटनसह इतर देशांवर हल्ले करण्याच्या तयारीत होता.
१९९८ ते २००१ या कालावधीत संभाव्य दहशतवादी संकटांबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना (बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात) अनेक वेळा सतर्क करण्यात आल्याचे या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. सीआयएने आपल्या अत्यंत संवेदनशील गुप्तचर सामग्रीबाबत ही अभूतपूर्व पारदर्शकता दाखवली आहे.(Osama Bin Laden India)