Sunday, September 13, 2026

Bandkhor Movie : ‘बंडखोर’ चित्रपटाची टीम पोहोचली महिला रिक्षाचालकांच्या भेटीला

Bandkhor Movie : ‘बंडखोर’ चित्रपटाची टीम पोहोचली महिला रिक्षाचालकांच्या भेटीला

मुंबई : घराची जबाबदारी पेलत रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेऊन स्वावलंबी झालेल्या महिला रिक्षाचालकांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी ‘बंडखोर’च्या टीमने ठाण्यात महिला रिक्षाचालकांची खास भेट घेतली. यावेळी छाया कदम, तितीक्षा तावडे, पूजा कातुर्डे आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी महिला रिक्षाचालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या जाणून घेतल्या. कलाकारांनी त्यांच्यासोबत वेळ घालवत रिक्षा चालवण्याचाही अनुभव घेतला. या भेटीदरम्यान महिला रिक्षाचालकांनी कलाकारांची भेट घेतल्याचा आनंद व्यक्त करत भावुक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. कलाकारांनीही त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला, तसेच ‘बंडखोर’च्या गाण्यावर एकत्र नृत्य करत ही भेट अधिक खास बनली. (Bandkhor Movie)

स्वतःच्या अस्तित्वासाठी, कुटुंबासाठी आणि स्वाभिमानासाठी वेगळा मार्ग निवडणाऱ्या या महिलांच्या जिद्दीची ‘बंडखोर’च्या कथेशीही एक वेगळी नाळ जोडली जाते. परिस्थितीपुढे न झुकता स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या या महिला म्हणजे खऱ्या अर्थाने ‘बंडखोर’ वृत्तीचं उदाहरण आहेत. (Bandkhor Movie)

संजय शेटये, विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद लेखन सिद्धार्थ साळवी आणि इरावती कर्णिक यांनी केले आहे. ‘बंडखोर’ हा सहा स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या संघर्षांची आणि स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयांची गोष्ट असून, येत्या २४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, तितीक्षा तावडे, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, महेश वामन मांजरेकर, मंगेश देसाई, सिद्धार्थ बोडके, माधव देवचके आणि संकेत पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Bandkhor Movie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >