INDW Vs ZIMW: टी20 नंतर झिम्बाब्वेला वनडे मालिकेत क्लिन स्विप, स्मृती मंधानाच्या नेतृत्वात विजयी घोडदौड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला 3-0 ने पराभूत केलं. यासह टी20नंतर वनडे मालिकेतही क्लिन स्विप दिला. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात हा पहिला वनडे मालिका विजय आहे.
October 28, 2026 06:11 PM
INDW Vs ZIMW: टी20 नंतर झिम्बाब्वेला वनडे मालिकेत क्लिन स्विप, स्मृती मंधानाच्या नेतृत्वात विजयी घोडदौड (Photo: BCCI Women Twitter)
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी येथे पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला. पण सामना मात्र भारताने जिंकला. या विजयासाठी भारताने झिम्बाव्बेला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लिन स्विप दिला आहे. स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा पहिला वनडे मालिका विजय आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 39.5 षटकात 10 गडी गमवून 131 धावा केल्या आणि विजयासाठी 132 धावा दिल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा भारतीय महिला संघाने सहज पाठलाग केला. भारताने 2 गडी गमवून 17 षटकात दिलेलं लक्ष्य गाठलं. यासह तीन समन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेला 3-0 ने पराभूत केलं.
भारताचा डाव
झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या 132 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. सलामीला आलेली यास्तिका भाटीया पहिल्याच चेंडूवर बाद झाली. त्यानंतर प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनी डाव सावरला. हरलीन देओल 19 चेंडूत 19 धावा करून बाद झाली. त्यानंतर प्रतिका रावल आणि शफाली वर्मा यांनी विजयी भागीदारी केली. प्रतिका रावलने 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. प्रतिका रावलने 56 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. यात तिने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. विजयासाठी 5 धावांची गरज असताना शफाली वर्माने षटकार मारला आणि अर्धशतक साजरं केलं. तिने 26 चेंडूत नाबद 51 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी केरळच्या कोच्चीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी एकूण 150 खेळाडूंची निवड झाली आहे. पण ...
झिम्बाब्वेचा डाव
प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर झिम्बाब्वेच्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. लॉरीन फिरीला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर चिपो मुगेरी तिरिपाने 4 आणि प्रिय बिझा 1 अशा धावसंख्येवर बाद झाले. तीन विकेट झटपट पडल्यानंतर मॉडेस्टर मुपाचिकवा आणि कर्णधार जोसेफिन न्कोमा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 27 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि जोसेफिन न्कोमाने चिएद्झा धुरुरूसोबत डाव सावरला. या जोडीने पाचव्या विकेटासटी 69 चेंडूत 43 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटली आणि झिम्बाब्वेचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. चिएद्झा धुरुरु 20 आणि जोसेफिन न्कोमो 35 धावा करून बाद झाले. तर मिशेल मावुंगा 6, न्याशा ग्वांझुरा 10, ओलिंदर चारे 0, नोमवेलो सिबांडा 3 धावा करून बाद झाले. तर फ्रान्सिस्का चिपारे 4 धावांवर नाबाद राहिली. भारताकडून वैष्णवी शर्माने 5, क्रांती गौडने 2, सायली सातघरे 2 विकेट काढल्या.