Nashik : गणेशोत्सवासाठी नाशिक पोलिस सज्ज ! तब्बल 'इतके' गुन्हेगार हद्दपार

Nashik : आज घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. तर अनेक मंडळांच्या गणपतीचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी आता नाशिक पोलीस देखील सज्ज झाले आहे. शहरातील सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत (Nashik City Police Commissionerate) व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे नाशिक पोलिसांकडून कुलही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ४०२ आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.(Nashik News)



४०२ आरोपींवर हद्दपारीची कारवाई


उत्सवाच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीकडून शांततेचा भंग, सार्वजनिक उपद्रव अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ एक आणि दोन अंतर्गत ४०२ आरोपींवर हद्दपारीची कारवाई(Action taken to extern 402 accused persons) करण्यात आली आहे. त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत शहर परिसरात वास्तव्यास राहण्यास मनाई करण्यात आली आहे. परिमंडळ एक अंतर्गत १२७, तर परिमंडळ दोन अंतर्गत २७५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.



पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे : आडगाव ०७, पंचवटी २२, म्हसरूळ १०, भद्रकाली २४, सरकारवाडा ११, गंगापूर २२ आणि मुंबईनाका ३१, अशी परिमंडळ एकमध्ये एकूण १२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे : अंबड ४०, सातपूर ५३, इंदिरानगर ३६, एमआयडीसी २५, नाशिकरोड ४२, उपनगर ४६ आणि देवळाली कॅम्प ३३, अशी परिमंडळ दोनमध्ये एकूण २७५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.(Nashik News)



नाशिक शहर पोलिसांकडून विशेष पोलीस बंदोबस्त


दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांकडून विशेष पोलीस बंदोबस्त, वाहन व पायदळ गस्त, संवेदनशील ठिकाणी विशेष निगराणी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि प्रतिबंधात्मक कारवाई यावर भर देण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; महाराष्ट्राच्या लोककलेचा देश-विदेशात व्यापक जागर

मुंबई : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि

Mayor's Residence Ganpati : महापौर निवासस्थानी बाप्पाचे भक्तिभावाने आगमन; पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा विशेष सन्मान

मुंबई :

Trump Statement : व्हेनेझुएलाच्या धर्तीवर इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत

वॉशिंग्टन : अ

Absconding Accused : ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा! अत्याचार प्रकरणातील २ फरार आरोपी अखेर मुंबईत अटकेत

मुंबई : जवळपास तीन दशकांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींना मुंबई

Jalgaon Crime News : ज्याला मुलगा मानलं त्यानेच घात केला ! 85 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या ; हत्येमागचं संतापजनक कारण...

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील करंजी येथून

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची हजेरी! हलका-मध्यम पाऊस, वाऱ्याचा जोर; IMDचा शहराला मोठा अलर्ट नाही

मुंबई : गणरायाच्या आगमनाने मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शहरात पावसानेही हजेरी लावली आहे.