दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन १५ सप्टेंबरला होणार आहे. मुंबईच्या टाइड डेटानुसार या दिवशी दुपारी सुमारे २.०५ ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान भरती असून लाटांची उंची सुमारे ४ मीटरपर्यंत राहू शकते. त्यानंतर रात्री सुमारे ८.०६ वाजता ओहोटी येईल. त्यामुळे विसर्जनासाठी समुद्रात उतरण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.(Ganeshotsav 2026)
दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महिला आशिया चषक २०२६च्या अंतिम सामन्यात भारताने ...
पाच दिवसांचा गणपती
१८ सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होईल. या दिवशी दुपारी सुमारे ३.३० वाजता भरती असून लाटांची उंची सुमारे ३.२ मीटर राहण्याचा अंदाज आहे. रात्री सुमारे १० वाजता ओहोटी येईल.(Ganeshotsav 2026)
गौरी-गणपती आणि सातवा दिवस
१९ सप्टेंबरला गौरी-गणपती विसर्जन होणार आहे. तर सातव्या दिवसाचे विसर्जन २० सप्टेंबरला होईल. २० सप्टेंबरला सकाळी सुमारे ७ वाजता भरती असून लाटांची उंची ३ मीटरपेक्षा अधिक राहू शकते. संध्याकाळी पुन्हा भरती येण्याची शक्यता आहे.(Ganeshotsav 2026)
नवी मुंबई: पुन्हा एकदा मुंबईमध्ये डेटिंग ॲपवरून तरूणींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार नवी मुंबईमध्ये घडला आहे. प्रसिद्ध ...
अनंत चतुर्दशीला मोठी भरती
यंदाची अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबरला आहे. या दिवशी सकाळी ११.०७ वाजता सुमारे ४.११ मीटरची भरती, तर संध्याकाळी ५.१६ वाजता ओहोटी आणि रात्री ११.२६ वाजता पुन्हा सुमारे ४.०१ मीटरची भरती अपेक्षित आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान समुद्रकिनारी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाकडून विविध ठिकाणी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी जीविताच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.(Ganeshotsav 2026)