Bigg Boss 20 : दुसऱ्या आठवड्यात तीन स्पर्धक नॉमिनेट ? कोणाच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार ?

Bigg Boss 20 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सिझन 20 मध्ये पहिल्याच आठवड्यापासून ड्रामा, वाद आणि मनोरंजन पाहायला मिळत आहे. नुकताच शोचा पहिला ‘विकेंड का वार’ पार पडला. यावेळी होस्ट सलमान खानने काही स्पर्धकांना फटकारलं, तर काहींचं कौतुकही केलं. पहिल्या आठवड्यात लव्ह गिल, अरिश्फा खान, उदिती सिंह आणि कनिका मान हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यामध्ये उदिती सिंहला सर्वात कमी मते मिळाल्याची माहिती समोर आली. मात्र, तिला मिळालेल्या अतिरिक्त जीवनदानामुळे ती एलिमिनेशनपासून वाचली.



दुसऱ्या आठवड्यात कोणते स्पर्धक नॉमिनेट ?


पहिल्या आठवड्याचा निकाल समोर आल्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशनही पार पडलं आहे. बीबी तकच्या रिपोर्टनुसार, आसिफ खान, रोहेद खान आणि तन्मय सिंह म्हणजेच स्काऊट या तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॉमिनेशन टास्कदरम्यान हे तिन्ही स्पर्धक नॉमिनेशनसंदर्भात चर्चा करत होते. ही बाब बिग बॉसच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण नॉमिनेशन टास्क रद्द करण्यात आला. त्यामुळे या तिघांवर आता थेट बेघर होण्याची टांगती तलवार आहे. (Bigg Boss 20)



कॅप्टन यंग डीसीएला मिळाला बचाव


या नॉमिनेशन चर्चेत घराचा कॅप्टन यंग डीसीए देखील सहभागी होता, अशी माहिती आहे. मात्र, तो घराचा कॅप्टन असल्यामुळे त्याला नॉमिनेशनपासून वाचवण्यात आलं. आता आसिफ खान, रोहेद खान आणि स्काऊट यांच्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. यापैकी कोणाचं ‘बिग बॉस’मधील जीवनदान संपणार, हे आगामी भागात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आणखी कोणता ट्विस्ट पाहायला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Kiran Gaikwad New Movie : ‘देवमाणूस’चा खतरनाक व्हिलन आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत; किरण गायकवाडच्या ‘F.I.R. NO. 469’चं पोस्टर लाँच

मुंबई : ‘किरण गायकवाड’ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ‘देवमाणूस’ मालिकेतील खतरनाक व्हिलन.

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं; पती राज निदिमोरूच्या 'त्या' कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले

Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती

Bigg Boss Telugu 10: हिंदी सोडा, बिग बॉस तेलुगुमध्ये 'या' स्पर्धकाचीच चर्चा; एका एपिसोडसाठी घेतोय लाखोंचं मानधन

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे.

Bandkhor Movie : ‘बंडखोर’ चित्रपटाची टीम पोहोचली महिला रिक्षाचालकांच्या भेटीला

मुंबई : घराची जबाबदारी पेलत रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेऊन स्वावलंबी झालेल्या महिला रिक्षाचालकांच्या संघर्षाला

Trisha Vijay Viral Video : लंडनमध्ये विजय-त्रिशा पुन्हा एकत्र दिसले! सिल्व्हरस्टोन रेसिंगमधील व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार दुसऱ्यांदा आई, बेबी बंप शेअर करत दिली 'गुड न्यूज'

मुंबई: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली