मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये ६ सप्टेंबरपासून बिग बॉस शो सुरू झाला आहे. कायमच वादग्रस्त म्हणून राहिलेल्या ह्या शोने आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉस तेलुगु शो सध्या एका कारणामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. या शोमध्ये एक असा स्पर्धक आहे, ज्याने एका एपिसोडसाठी लाखो रूपये मानधन आकारलं आहे. त्याच्या मानधनाने फक्त चाहतेच नाही तर, निर्मातेही अचंबित झालेय. नेमका हा स्पर्धक आहे तरी, चला जाणून घेऊया...
Bandkhor Movie : ‘बंडखोर’ चित्रपटाची टीम पोहोचली महिला रिक्षाचालकांच्या भेटीला
मुंबई : घराची जबाबदारी पेलत रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेऊन स्वावलंबी झालेल्या महिला रिक्षाचालकांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी ‘बंडखोर’च्या टीमने ...
बिग बॉस तेलुगुच्या दहाव्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी टॉलिवूड सुपरस्टार नागार्जुन यांच्यावर आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शोचे होस्ट म्हणून टॉलिवूड अभिनेते नागार्जुन एका सीझनसाठी ३५ ते ४० कोटी रूपये मानधन घेत आहेत. नागार्जुन होस्टिंग करत असलेल्या शोमध्ये एक असा कॉमेडियन आहे जो एका एपिसोडसाठी लाखो रूपये मानधन घेत आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणीही नसून कॉमेडियन रामप्रसाद आहे. बिग बॉस तेलुगुचं यंदाचं दहावं सीझन सरप्रायजिंग एलिमिनेशनमुळे चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हिस्सा घेतला आहे. त्यापैकीच एक कॉमेडियन रामप्रसाद आहे.
Trisha Vijay Viral Video : लंडनमध्ये विजय-त्रिशा पुन्हा एकत्र दिसले! सिल्व्हरस्टोन रेसिंगमधील व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दोघांचे काही नवे व्हिडीओ सध्या सोशल ...
मिडिया रिपोर्टनुसार, रामप्रसाद 'बिग बॉस तेलुगु'च्या दहाव्या सीझनमध्ये एका एपिसोडसाठी ५ लाख रूपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे. त्याकडे यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक महागडा स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. राम प्रसादचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शोच्या टीआरपीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांमध्ये राम प्रसादची देखील गणना होते. त्याने आपल्या कॉमेडीच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कॉमेडीच्या जोरावरच रामप्रसादने प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने आपल्या कलागुणांच्या जोरावरच प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. बिग बॉसच्या घरातूनही चाहत्यांनाही तो आपलंसं करताना दिसतोय.
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार दुसऱ्यांदा आई, बेबी बंप शेअर करत दिली 'गुड न्यूज'
मुंबई: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी माहिरा खान ...
जरीही रामप्रसादने बिग बॉसच्या मेकर्सकडून लाखो रूपयांचं मानधन घेतलं असलं तरीही तो सर्वांचंच चांगलंच मनोरंजन करत आहे. बिग बॉस हिंदीचा होस्ट आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, गेल्या अनेक सीझनपासून या शोचे सूत्रसंचालन करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो संपूर्ण सीझनसाठी १२० कोटी रुपयांचे मोठे मानधन घेत आहे. बिग बॉस २० चा भव्य प्रीमियर ६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. या वर्षीच्या स्पर्धकांमध्ये मेरी कोम, उदिती सिंग, आम्रपाली दुबे, ईशा रिखी, कनिका मान, अमन गांधी, माही विज, काझी तौकीर आणि यंग डीएसए यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश आहे.