Tuesday, September 15, 2026

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संतापजनक म्हणजे अपघातानंतर मदत करण्याऐवजी आयशर चालक पसार झाला. किरण चांगदेव नरोडे (Kiran Changdev Narode) (३३, रा. गणेशनगर, पिंपळगाव बसवंत) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणात चालकाविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

सोमवारी (दि. १४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास किरण नरोडे हे पल्सर दुचाकीने सर्व्हिस रोडने मुंबईकडून धुळ्याच्या दिशेने प्रवास करत होते. डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर पोहोचताच मागून आलेल्या अज्ञात आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, किरण यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला अत्यंत गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच किरण यांचे बंधू सुरेश नरोडे यांनी प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने गंभीर जखमी किरण यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले.

मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर पळ काढणाऱ्या चालकाविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार टेमगर याप्रकरणी अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आयशर व चालकाचा शोध सुरु आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >