Dagdusheth Ganpati Atharvashirsha Pathan 2026 : पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; दगडूशेठ गणपती प्रांगणात ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!

पुणे : गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात पुण्यात ऋषीपंचमीनिमित्त भक्ती आणि स्त्रीशक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganpati) मंदिराच्या परिसरात पारंपरिक वेशभूषेत आलेल्या ३५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. 'ॐ नमस्ते गणपतये' आणि 'मोरया मोरया'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पहाटेपासूनच पावसाळी वातावरण असतानाही महिलांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून आली नाही.



अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे ४१ वे वर्ष


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने, ट्रस्टच्या १३४ व्या गणेशोत्सव वर्षाच्या निमित्ताने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे यंदाचे ४१ वे वर्ष होते. यंदा उत्सव मंडपासमोर उभारण्यात आलेल्या श्री वृंदावन येथील 'प्रेम मंदिराच्या' आकर्षक प्रतिकृतीसमोर हा संपूर्ण सोहळा पार पडला.



मध्यरात्रीपासूनच महिलांची गर्दी, विविध जिल्ह्यांतून भाविक दाखल


या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महिलांनी मध्यरात्री २ वाजल्यापासूनच मंदिर परिसरात उपस्थित राहण्यास सुरुवात केली होती. पहाटेपर्यंत ही गर्दी इतकी वाढली की दगडूशेठच्या मुख्य मंडपापासून थेट नाना वाड्यापर्यंत फक्त महिलांचेच अथांग सागर पाहायला मिळत होते. केवळ पुण्यातीलच नव्हे, तर मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर यांसारख्या विविध जिल्ह्यांतूनही महिला विशेषतः या पठणासाठी पुण्यात दाखल झाल्या होत्या.



मंत्रमुग्ध करणारा शंखनाद आणि ओंकार जप


कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी केलेल्या गगनभेदी शंखनादाने झाली. यानंतर हजारो महिलांनी एकाच सुरात ओंकार जप केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक दिव्य आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. 'गणराजा गणनायका' आणि 'मोरया रे बाप्पा मोरया रे' यांसारख्या भक्तीगीतांनंतर हजारो कंठांतून एकाच वेळी अथर्वशीर्षाचे मंत्र उच्चारले गेले. पठण पूर्ण झाल्यानंतर 'मोरया मोरया, दगडूशेठ मोरया'चा जयघोष करत आणि टाळ्यांचा गजर करत महिलांनी बाप्पाला नमन केले.



भाविकांच्या मनोगतातून भक्तीचा अनुभव


गेल्या १० वर्षांपासून या उपक्रमात नियमित सहभागी होणाऱ्या दिपाली यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, "पहाटे दोन वाजल्यापासूनच वातावरण भक्तीमय झालेले असते. शंखनाद, ओंकार आणि अथर्वशीर्ष पठणात दोन-तीन तास कसे निघून जातात हे समजतच नाही. इथे आल्यावर संपूर्ण वर्ष सार्थक झाल्याची भावना निर्माण होते." बुधवार पेठ येथील स्थानिक रहिवासी कांचन अनवेकर यांनी सांगितले की, "आम्ही वर्षभर या ऋषीपंचमीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा हे पठण झाले की पुढच्या वर्षाच्या सोहळ्याचे वेध लागतात." एकंदरीत, ऋषीपंचमीच्या पावन प्रसंगी दगडूशेठ गणपतीसमोर पार पडलेल्या या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने पुणेकरांना भक्ती, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचे एक नयनरम्य रूप दाखवून दिले.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,