Wednesday, September 16, 2026

EPFO New Update : EPFOचा मोठा निर्णय! वेतन मर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजार होणार; ५१ लाख कर्मचाऱ्यांना फायदा

EPFO New Update : EPFOचा मोठा निर्णय! वेतन मर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजार होणार; ५१ लाख कर्मचाऱ्यांना फायदा

नवी दिल्ली : कर्मचारी वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत अनिवार्य समावेशासाठीची मासिक वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजार करण्यास मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. हा बदल लागू झाल्यास सध्या ₹१५ हजार ते ₹२५ हजार मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना EPFOच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सरकारच्या अंदाजानुसार, या निर्णयामुळे ५१ लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी EPFOच्या कक्षेत येऊ शकतात. (EPFO New Update)

सध्या EPF योजनेअंतर्गत अनिवार्य कव्हरेजसाठी वेतनमर्यादा ₹१५ हजार आहे. ही मर्यादा १ सप्टेंबर २०१४ पासून लागू आहे. त्यानंतर वेतनपातळी आणि रोजगाराच्या स्वरूपात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षेचा विस्तार करण्यासाठी मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (EPFO New Update)

PF, पेन्शन आणि विम्याचा लाभ

नवीन मर्यादा लागू झाल्यास ₹१५ हजार ते ₹२५ हजार मासिक वेतन असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांचा EPFOच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समावेश होऊ शकतो. यामुळे EPF बचत, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना (EDLI) यांसारख्या सुविधांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. (EPFO New Update)

EPFO व्यवस्थेत कर्मचारी आणि नियोक्त्याकडून योगदान दिले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकालीन बचत तसेच निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या योजनेला महत्त्व आहे. (EPFO New Update)

अंमलबजावणी कधी होणार?

वेतनमर्यादा वाढवण्याचा निर्णय लागू करण्यासाठी आवश्यक नियम, अधिसूचना आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख आणि पात्रतेचे अंतिम निकष केंद्र सरकार व EPFOकडून स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित होतील.

मर्यादा ₹२५ हजार झाल्यास सध्या EPFOच्या अनिवार्य कक्षेबाहेर असलेल्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना औपचारिक सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत सामील होण्याची संधी मिळू शकते. (EPFO New Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >