- वैद्यकीय महाविद्यालय, कणकवली बसस्थानकासह आरोग्य आणि मत्स्यविकासाच्या कामांचा आढावा
- आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांना गती देण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात बुधवारी झालेल्या विविध बैठकांमध्ये सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय, कणकवली बसस्थानकाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास, आशिये गावातून कणकवली बस डेपोकडे जाणारा रस्ता तसेच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. (Nitesh Rane)
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकाम प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा तसेच कामातील विलंबाच्या कारणांचा राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून बांधकामाला वेग देण्याच्या सूचना संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना देण्यात आल्या. कामाच्या प्रगतीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका राणे यांनी घेतली. प्रकल्पासाठी आवश्यक समन्वय साधून सर्व संबंधितांनी गतीने काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले. सिंधुदुर्गातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प निर्धारित गतीने पुढे नेण्यासाठी सातत्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Nitesh Rane)
मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू ...
कणकवली बसस्थानकाचा पीपीपी मॉडेलवर विकास करण्याबरोबरच आशिये गावातून कणकवली बस डेपोकडे जाणारा रस्ता विकसित करण्याच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या दोन्ही कामांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था, प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेण्याचे निर्देश देण्यात आले. (Nitesh Rane)
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवरही स्वतंत्र आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा आणि प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संबंधित अधिकारी आणि विभागांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देत सिंधुदुर्गातील नागरिकांना आरोग्यसेवेसंदर्भात कोणतीही अडचण भेडसावू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. (Nitesh Rane)
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. ...
मत्स्यसंपदा योजनेच्या निधीविलंबाची दखल
- मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणासाठी आवश्यक लेखाशीर्ष तयार करण्यास होत असलेल्या विलंबाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. निधी वितरणाची प्रक्रिया विनाकारण प्रलंबित राहू नये आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित विकासकामांना निधीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव व आयुक्त तसेच नियोजन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
- दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यालय उभारण्याबाबतही राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. गडचिरोलीत प्रस्तावित मत्स्यालय आकर्षक आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरेल, अशा पद्धतीने त्याची उभारणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, विभागांमध्ये समन्वय आणि सक्रियपणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, आयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.