Nitesh Rane : गडचिरोलीच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा; सेमान्यात उभारणार अत्याधुनिक मत्स्यालय, नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने करावी. पारंपरिक स्वरूपाचे मत्स्यालय न उभारता पर्यटकांना वेगळा अनुभव देणारी संकल्पना राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने कामाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Nitesh Rane)


मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाच्या उभारणीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी प्रकल्पाच्या आराखड्याचे आणि संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. (Nitesh Rane)



८८ हून अधिक प्रजातींचे शोभिवंत मासे


सेमाना येथे सुमारे एक ते सव्वा एकर जागेवर हे मत्स्यालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. येथे सुमारे ५४ अॅक्रेलिक टाक्या उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ८८ पेक्षा अधिक प्रजातींचे गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे ठेवण्यात येणार आहेत. आर. आर. मत्स्यालय सल्लागार संस्थेने विविध प्रजातींच्या गोड्या पाण्यातील माशांवर आधारित प्रकल्पाची संकल्पना बैठकीत सादर केली. (Nitesh Rane)



पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा उभारण्यावर भर


गडचिरोलीतील नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय आणखी एक आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनासह जिल्ह्याच्या पर्यटनविकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.



मत्स्यालयाचे बाह्य आणि अंतर्गत स्वरूप, माशांच्या टाक्यांची रचना तसेच पर्यटकांसाठीच्या सुविधा आधुनिक आणि आकर्षक असाव्यात, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी आवश्यक समन्वय साधून पुढील कार्यवाही वेगाने करावी. वन विभागाशी संबंधित बाबींवर वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले. (Nitesh Rane)


बैठकीस गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करा; ब्रिजेश सिंह यांचे निर्देश

डिजिटल, सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरची ओळख जागतिक स्तरावर

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील रखडलेले प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

- वैद्यकीय महाविद्यालय, कणकवली बसस्थानकासह आरोग्य आणि मत्स्यविकासाच्या कामांचा आढावा - आमदार निलेश राणे आणि

Tukaram Mundhe : ११ रुपयांच्या सलाईन नळीची ३२५ रुपयांना विक्री, तुकाराम मुंढेंचे केंद्राला पत्र; ‘ट्रेड प्राइज’ आणि ‘एमआरपी’तील फरकावर नियमनाची शिफारस

मुंबई : रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किमती आणि त्यावर छापलेल्या कमाल

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची भेट घेतल्याचा विश्व हिंदू परिषदेचा दावा

मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात १९९३ च्या

मराठा-कुणबी नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीला मंत्रालयात कार्यालय - फडणवीस सरकारचा निर्णय; मराठा आरक्षण कक्षाचे कामकाजही याच ठिकाणाहून चालणार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा-कुणबी नोंदींचा शोध आणि आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन कामकाज अधिक

Pratiksha Tejankar : शासकीय कार्यालयात रील शूट करणे तहसीलदारांना भोवले; विशेष पथकामार्फत चौकशीचे आदेश

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या शासकीय कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’