Plane Emergency Landing : विमान हवेत असतानाच टायर फुटला, लँडिंगवेळी छताचा भाग प्रवाशांवर कोसळला अन्...

Iran Plane Emergency Landing : विमान प्रवास म्हटलं की सुरक्षिततेचा विचार सर्वात आधी केला जातो. पण विमान हवेत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि लँडिंगच्या वेळी विमानाच्या केबिनमधील छताचा भागच प्रवाशांवर कोसळला तर? इराणमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये विमानातील प्रवासी घाबरून किंचाळताना दिसत आहेत. काही क्षणांतच प्रवाशांचं सामान खाली पडतं आणि केबिनच्या छताचा आतील भागही कोसळताना दिसतो. मात्र, या थरारक घटनेनंतर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.



उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग


ही घटना मंगळवारी इराणमध्ये घडली. सेपेहरान एअरलाइन्सचं बोइंग ७३७ विमान मश्हदहून करमानशाहच्या दिशेने उड्डाण करत होतं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर पायलटने आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि विमान पुन्हा मश्हद विमानतळाकडे वळवण्यात आलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टेकऑफच्या वेळी विमानाच्या लँडिंग गिअरमधील एका टायरला नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या कारणाची अधिकृत पुष्टी झालेली नव्हती. (Iran Plane Emergency Landing)



लँडिंगच्या वेळी नेमकं काय झालं ?


विमान पुन्हा विमानतळावर उतरवताना परिस्थिती आणखी थरारक झाली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये केबिनच्या छताचा आतील भाग अचानक खाली कोसळताना दिसतो. त्यासोबत प्रवाशांचं सामानही खाली पडत होतं. विमान हलत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि अनेकजण जोरजोरात ओरडताना दिसले. छताचा भाग कोसळल्यामुळे विमानाच्या आतील काही भाग उघडा झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Iran Plane Emergency Landing)



सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित


या घटनेचा व्हिडीओ पाहून अपघाताची भीती निर्माण होत असली, तरी सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचं वृत्त नाही. विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. यानंतर प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी करमानशाहला जाणाऱ्या दुसऱ्या विमानातून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विमानात नेमकी तांत्रिक समस्या कशामुळे निर्माण झाली आणि केबिनच्या छताचा भाग का कोसळला, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

Comments
Add Comment

Thalapathy Vijay : लंडनमध्ये विजयच्या स्वागतासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द

London : लंडनमधील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘द शार्ड’ (The Shard) च्या बाहेर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची एक

Los Angeles News : लॉस एंजेलिसमध्ये न्यूज हेलिकॉप्टर कोसळले, 3 जणांचा मृ्त्यू, बस अपघाताच्या वृत्तांकनादरम्यान दुर्घटना

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. सॅन फर्नांडो व्हॅलीतील चॅट्सवर्थ

Saudi uranium reserves : सौदी अरेबियात ११ कोटी टन खनिज साठ्याचा शोध; मदिनाजवळ युरेनियम आणि दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांचे मोठे भांडार सापडले

रियाध: सौदी अरेबियाने आपल्या खनिज संपत्तीमध्ये एक मोठी भर घातली असून, मदिनातील जबल सईद भागात सुमारे ११ कोटी टन

US Military Bases Iran : अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांचे आणि राजनैतिक संकुलांचे इराणच्या हल्ल्यात मोठे नुकसान; पेन्टागॉनचा अहवाल उघड

वॉशिंग्टन:

Trump Statement : व्हेनेझुएलाच्या धर्तीवर इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत

वॉशिंग्टन : अ

Houthi drone strike : सौदी अरेबियावर हुतींचा मोठा ड्रोन हल्ला; लष्करी तळाला लक्ष्य केल्याचा दावा, दोन जण जखमी

रियाद: मध्य-पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक स्फोटक आणि गंभीर होत चालली आहे. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या