Wednesday, September 16, 2026

Shiv Sena party and symbol : सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचा युक्तिवाद; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर थेट आक्षेप

Shiv Sena party and symbol : सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचा युक्तिवाद; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर थेट आक्षेप

नवी दिल्ली: र्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर गंभीर आक्षेप घेतला आहे. शिंदे गटातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी, उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा वापर वैयक्तिक व्यवस्थेसारखा केल्याचा आणि पक्षात एकाधिकारशाही चालवल्याचा जोरदार युक्तिवाद केला आहे.(Shiv Sena party and symbol)

पक्षाला लोकशाहीऐवजी एकाधिकारशाहीने चालवले

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादादरम्यान नीरज कौल यांनी पक्षाच्या प्रमुख पदावर आणि अंतर्गत रचनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, २०१३ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा सन्मान म्हणून 'शिवसेनाप्रमुख' हे पद गोठवण्यात आले होते. त्यानंतर 'पक्षप्रमुख' पद निर्माण करण्यात आले. बाळासाहेबानंतर पक्षाकडून चांगल्या उत्तरदायित्वाची अपेक्षा होती, मात्र उद्धव ठाकरेंकडून ती पूर्ण झाली नाही. ठाकरेंनी पक्षाला लोकशाही मार्गाने चालवण्याऐवजी एकाधिकारशाही चालवली आणि पक्षाचा वापर वैयक्तिक व्यवस्थेप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर दावा कौल यांनी केला.(Shiv Sena party and symbol)

वाद शिंदेंच्या नियुक्तीचा नव्हे, तर मूळ पक्षाचा

हा सध्याचा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचा नसून, नेमकी कोणती बाजू 'मूळ पक्ष' आहे याचा असल्याचा मुद्दा कौल यांनी अधोरेखित केला. एकनाथ शिंदेंनी आमदार किंवा मंत्री म्हणून जे काही काम केले ते लोकप्रतिनिधी म्हणून केले होते, त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षात अंतर्गत लोकशाही जिवंत राहणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला संघटना कशी चालावी यावर बोलण्याचा अधिकार असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. पक्षात मोजक्याच लोकांच्या हाती सूत्रे देऊन एकाधिकारशाही प्रस्थापित केली गेल्याचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला. तसेच, निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह ठरवताना लावलेली चाचणी (टेस्ट) पूर्णपणे योग्य असल्याचे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले.(Shiv Sena party and symbol)

काय घडले होते मागील सुनावणीत?

यापूर्वीच्या युक्तिवादातही नीरज कौल यांनी विधिमंडळापुरती मर्यादित नसून थेट राजकीय पक्षातच फूट पडल्याचा दावा केला होता. बाळासाहेबांच्या विचारांशी व भूमिकेशी विसंगत भूमिका घेत महाविकास आघडीसोबत जाण्याच्या निर्णयामुळे पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या अंतिम सुनावणीमुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणातील पुढील सुनावणी व न्यायालय काय निकाल देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.(Shiv Sena party and symbol)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >