२५ वर्षांचा अविरत सेवाकाळ आणि कर्तृत्वाची उंची
प्रधानमंत्री मोदींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासात पदे आणि जबाबदाऱ्या बदलल्या, परंतु त्यांचा ‘सेवेचा संकल्प’ कधीही बदलला नाही, असे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, मोदींच्या बाबतीत वयाचे आकडे नव्हे तर कर्तृत्वाची उंची मोजली जाते. ती हिमालयाच्या उंचीने आणि जनतेप्रती असलेल्या कार्याची खोली अरबी समुद्राने मोजावी. गॅस, पक्की घरे, बँक खाती आणि नळाचे पाणी यांसारख्या योजनांमुळे विकास थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला गेला आहे.(Narendra Modi 25 years of service)
Dhule Accident News : शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाच्या शिवारात भीषण अपघात घडला आहे. भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने चार जणांचा ...
विकसित भारताचा संकल्प आणि राष्ट्रीय प्रगती
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी देशाच्या वाढत्या जागतिक प्रतिमेचा लेखाजोखा मांडला:
-
आर्थिक भरभराट: भारत जगातील १० व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प आहे.
-
सुरक्षित आणि सक्षम भारत: कलम ३७० चे उच्चाटन, देशाची मजबूत सुरक्षा आणि लष्कराच्या सामर्थ्यामुळे एका नव्या भारताची निर्मिती झाली आहे.
-
जागतिक प्रतिष्ठा: BRICS, ग्लोबल साऊथ, डिजिटल तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यात भारताची भूमिका निर्णायक ठरली असून विविध देशांनी मोदींना सन्मानित करणे हा १४० कोटी भारतीयांचा गौरव आहे.
2047 च्या विकसित भारताची नवी दिशा
महात्मा गांधी व सरदार पटेल यांच्या गुजरातमधून स्वातंत्र्याचे आंदोलन उभे राहिले होते, त्याच भूमीतून प्रधानमंत्री मोदींनी विकसित भारताचे ध्येय जनआंदोलन बनवले आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत, तंत्रज्ञानसक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या या प्रवासात वडनगरची ही ठिणगी आता संपूर्ण भारताची क्रांती बनली आहे, जी २०४७ च्या विकसित भारताचा बुलंद आवाज ठरेल, असा दृढ विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.(Narendra Modi 25 years of service)
या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते





