Thursday, September 17, 2026

BMC News : महापालिका आयुक्तांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लावले राणीबागेत ‘सेंच्युरी पाम’

BMC News : महापालिका आयुक्तांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लावले राणीबागेत ‘सेंच्युरी पाम’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियान अंतर्गत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात (राणीबाग)महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते ‘सेंच्युरी पाम’ या वृक्षाची लागवड केली. सेंच्युरी पाम या वृक्षाची लागवड करून महापालिका आयुक्तांनी देशाच्या पंतप्रधानांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस साजरा केला.(Rani Baug Mumbai)

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आज भेट देऊन येथील विविध प्रकल्प आणि उपक्रमांची पाहणी केली. या उद्यानातील‘जास्वंद प्रदर्शन’चेही भिडे यांनी यावेळी अवलोकन केले. या प्रदर्शनात जास्वंद वनस्पतीच्या विविध रंगांच्या सुमारे ५० प्रजाती उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन जनतेसाठी खुले असून त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.(Century Palm Tree)

तसेच, केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियान अंतर्गत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानात ‘सेंच्युरी पाम’ या वृक्षाची त्यांनी लागवड केली. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘बोगद्यातील मत्स्यालय’च्या बांधकामाची त्यांनी पाहणी करत जानेवारी २०२७ पर्यंत सादर बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.(Mumbai Zoo)

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.(Narendra Modi Birthday)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >