अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय' या नावाने २०२६ पासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या बद्दलच्या साशंकतांना पूर्णविराम मिळाला आहे.
Mumbai Filmcity News: फिल्मसिटीमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण
मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये फिल्म सिटी अर्थात चित्रनगरी आहे. या चित्रनगरीमध्ये मराठीसह हिंदी भाषेतील मालिकांची आणि चित्रपटांची इथे शुटिंग केली ...
अहिल्यानगरला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४५० खाटांच्या रुग्णालयास सरकारने आधीच मान्यता दिली होती. त्यानुसार हे महाविद्यालय यावर्षीपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण, २०२६- २७ या वर्षासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे केलेले अपीलही फेटाळण्यात आले होते. आता याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १५ सप्टेंबर रोजी प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी दिली आहे.
Nandurbar News : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्राणी येथील अनुदानित आश्रमशाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षीय ...
नगर शहर परिसरातील हे दुसरे वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे. याआधी विळद घाटात विखे फाउंडेशनचे खासगी वैद्यकीय महाविद्यालय आधीपासून सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरापासून सुमारे पाच किलोमीटरवरील कापूरवाडी परिसरात सुरू होणार आहे. तेथील इमारती व इतर सुविधा निर्माण होईपर्यंत हे महाविद्यालय नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आयुष विभागात सुरू होणार आहे.