FDA Action In Mumbai: अन्न- औषध प्रशासनाने नायर हॉस्पिटलच्या कॅन्टीनला ठोकलं टाळं, १४ हॉटेल- रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. नागपुरामध्ये १२ लाखांचा गुटखा जप्त करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर, मुंबईमध्ये तब्बल १४ हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई अंतर्गत ७ लाख ३८ हजार २३० रूपये किंमतीचा २८१३ कि.ग्रॅ. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर, संपूर्ण राज्यभर २७ हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा इत्यादीच्या तपासणी करत १४ आस्थापनांचे परवाने निलंबित करून १३ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.



४,६६,८०२ रूपये किंमतीचा आणि २,५८०.७ किलो व १२.५ लिटर इतर अन्नपदार्थाचा (दुग्धजन्य पदार्थ, सुपारी, विविध नमकीन व ताडी) साठा जप्त करण्यात आला आहे. सोबतच, ग्राहक तक्रारीवरून कुलाबा येथील 'ऑलिम्पिया कॉफी हाऊस'चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. मीरा रोडमधील काशिमीरा परिसरामध्ये, अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीमध्ये सुटा खवा, गोड मावा होता. हे दोन्हीही पदार्थ विनालेबल स्वरूपात तसेच इतर पॅकबंद अन्नपदार्थ अस्वच्छ वातावरणात आणि योग्य तापमान नियंत्रण न ठेवता साठवणूक व वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून कलम २३, २६ व २७ नुसार उल्लंघनाप्रकरणी जप्त करण्यात आले.



दोन गाड्या जप्त करत, लाखो रूपयांचा माल एफडीएने जप्त केला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुग्धजन्य मिठाई, खवा आणि रबडी जप्त केली आहे. विनालेबल, अस्वच्छ वातावरणात तयार केल्याचे, निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरून, परवान्यात आवश्यक बदल न करता उत्पादन करणे आणि लेबलवरील त्रुटींप्रकरणी हे सामान जप्त करण्यात आले आहे. नागपूर विभागामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या (गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू इत्यादी) अवैध विक्री, साठवणूक व वाहतुकीविरूद्ध दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी ३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान ₹४,१०,७८२/-किंमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ₹८,००,०००/- किंमतीची २ वाहने, असा एकूण ₹ १२,१०,७८२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अन्वये संबंधित पोलीस ठाण्यात ३ प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आले असून ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. ग्राहक तक्रारीवरून कुलाबा येथील 'ऑलिम्पिया कॉफी हाऊस'चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अस्वच्छता, चुकीच्या पद्धतीने जेवण बनवणे, अस्वच्छ पाण्याचा वापर आणि किचनमध्ये झुरळे व माशांचा प्रादुर्भाव यांसह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे परवाना निलंबित केला आहे. नायर हॉस्पिटलच्या कॅन्टीनचाही अस्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित केला आहे. चेंबुर, घाटकोपर, वरळी इथल्या काही बेकरी आणि हॉटेलचेही परवाने निलंबित केले आहे.
Comments
Add Comment

वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्याची गरूडझेप, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर 'सहयोगी व आरोग्यसेवा परिषद' स्थापनेच्या कार्यवाहीला गती

मुंबई: राज्यातील आरोग्यसेवा आणखीन सुधारण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम पद्धतीची सेवा लाभण्यासाठी वैद्यकीय

Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार

अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले

Mumbai Filmcity News: फिल्मसिटीमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण

मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये फिल्म सिटी अर्थात चित्रनगरी आहे. या चित्रनगरीमध्ये मराठीसह हिंदी भाषेतील

Nitesh Rane On Uddhav Thackeray: "आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग...", दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय दौरा काढणाऱ्या उद्धव

Nandurbar News : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्राणी येथील अनुदानित

Pune MHADA Lottery 2026: घर खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाच्या 4462 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे: पुण्यामध्ये म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे