Nitesh Rane On Uddhav Thackeray: "आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग...", दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय दौरा काढणाऱ्या उद्धव ठाकरेंचा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ‘आधी अंगावर लागलेला डाग पुसावा आणि मग असे दौरे काढावेत,’ अशी टीका राणे यांनी केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या समाजमाध्यमावरील पोस्टविषयी विचारण्यात आले. त्यावर राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये मांडलेली भूमिका यापूर्वीच न्यायालयात मांडण्यात आली आहे. न्यायालयाने ती भूमिका स्वीकारलेली नसून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता समाजमाध्यमावर पोस्ट करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जाण्याची आणि सत्य काय आहे ते सांगण्याची वेळ आली असल्याचे राणे यांनी म्हटले.



उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, “एका महिलेच्या खुनाचा आणि सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींनी सामाजिक जीवनात येऊन अशा पद्धतीची भाषणे करावीत का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. उद्या दाऊदही बाहेर येऊन भाषण करेल आणि भारताचे भविष्य कसे घडवायचे, हे सांगेल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आधी अंगावर लागलेला डाग पुसावा आणि मग अशा पद्धतीचे दौरे काढावेत", असे नितेश राणे यांनी सांगितले.

राऊतांनी उद्धव ठाकरेंना निवृत्तीचा सल्ला द्यावा


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची ७५ पूर्ण केल्याने निवृत्ती घ्यावी, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, ‘‘निवृत्ती घ्यायची असेल तर संजय राजाराम राऊत यांच्या मालकाने घेतली पाहिजे. कारण आता मुलगा पण खून आणि बलात्काराच्या केसमध्ये अडकलेला आहे. हात खुनाने बरबटलेले आहेत. यांच्याच मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत खून आणि बलात्काराचे सगळे आरोप यांच्यावर झालेले आहेत. एफआयआरमध्ये नाव स्वतः उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांना कोणतेही सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांनी आधी आपल्या ‘मालकाला’ सल्ला द्यावा", असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

केंद्र सरकारकडून पुणेकरांना दिवाळी गिफ्ट, 21,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (3 नोव्हेंबर- मंगळवार) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास, व्हिडिओ

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मृद व जलसंधारण कामांसाठी समितीची स्थापना

मुंबई: राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली आहे. राज्य सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Pune Metro : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पिंक लाईन’ प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल पुणे : पुणे शहराच्या नागरी

Central Railway News: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या... मध्य रेल्वेने 'या' दोन लांबपल्ल्यांच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात केला बदल

मुंबई: मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या मेल- एक्स्प्रेसबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनो जर

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना 291 कोटींची मदत, मदत- पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती

मुंबई: यंदाच्या वर्षी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये, अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना किती कोटींची

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24 योजनांचा लाभ आता ऑनलाइन; मंत्री नितेश राणेंचे आवाहन

राज्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी 2.0 (https://mahadbt2.maharashtra.gov.in/)