Nandurbar News : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्राणी येथील अनुदानित आश्रमशाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.



उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील अक्राणी येथे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यावाडी, जि. धुळे संचलित अनुदानित आश्रमशाळेत ही घटना घडली. संबंधित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. विषारी औषध प्राशन केल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.



मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट


घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, विद्यार्थिनीने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास धडगाव पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane On Uddhav Thackeray: "आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग...", दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय दौरा काढणाऱ्या उद्धव

Pune MHADA Lottery 2026: घर खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाच्या 4462 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे: पुण्यामध्ये म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे

Beed Pune direct train : ऐतिहासिक क्षण! बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा दिमाखदार शुभारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचेही भूमिपूजन

बीड :

Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : मराठवाड्यातील संजय आनंदराव लाठकर यांच्यावर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुरक्षेची महत्त्वाची

Maharashtra Water Shortage: राज्यावर ‘पाणीटंचाई’चे सावट, टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

मुंबई: राज्यातील अनेक भागांत सप्टेंबरचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने

Dhule Accident News : शिरपूर - चोपडा रस्त्यावर भीषण अपघात, चार मजुर ठार

Dhule Accident News : शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाच्या शिवारात भीषण अपघात घडला आहे. भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला