Thursday, September 17, 2026

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जमणारा लाखोंचा जनसागर! याच मुंबईच्या गणेशोत्सवातील भावनिक क्षणाला एका कलाकाराने मिनिएचर स्वरूपात साकारले आहे. गिरगाव चौपाटीवरील गणपती विसर्जन सोहळ्याचा हुबेहूब देखावा चिरा बाजार येथील एका घरात उभारण्यात आला आहे. या अनोख्या कलाकृतीतून मुंबईच्या गणेशोत्सवातील विसर्जनाची परंपरा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.(Mumbai Ganeshotsav)

आठ फूट उंच मिनिएचरमध्ये गिरगाव चौपाटीचा देखावा

गिरगाव चौपाटीवरील गणपती विसर्जनाचा भव्य सोहळा आता एका मिनिएचर देखाव्यात पाहायला मिळत आहे. सुमारे आठ फूट उंच असलेल्या या देखाव्यात विसर्जन मिरवणुकीचे विविध प्रसंग साकारण्यात आले आहेत. गणेशभक्तांची गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त आणि विसर्जनाशी संबंधित दृश्ये यांचा समावेश या कलाकृतीत करण्यात आला आहे.(Mumbai Ganeshotsav)

मुंबईच्या गणेशोत्सवातील हा महत्त्वाचा क्षण छोट्या स्वरूपात साकारल्यामुळे या देखाव्याची चर्चा होत आहे.

 
Instagram पर यह पोस्ट देखें
 

Mann❤️ (@travelwith.mann) द्वारा साझा की गई पोस्ट

VFX कलाकार मन्न रेले यांची अनोखी कलाकृती

हा देखावा VFX कलाकार मन्न रेले यांनी तयार केला आहे. यासाठी 3D प्रिंटिंग आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. तंत्रज्ञान आणि कलात्मक कल्पकतेच्या मदतीने गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याचे बारकावे मिनिएचरमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या देखाव्यात गणेशभक्तांसोबत मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचीही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही देखाव्यात समावेश करण्यात आला आहे.(Mumbai Ganeshotsav)

पाणी बचतीचा संदेशही

गणेशोत्सवाच्या उत्साहासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचाही प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कलाकृती गणेशोत्सवातील सामाजिक संदेशाकडेही लक्ष वेधते. मुंबईच्या गणेशोत्सवातील विसर्जन सोहळा, भक्तांची श्रद्धा आणि सार्वजनिक व्यवस्थेचे चित्र एका छोट्या देखाव्यात साकारल्यामुळे ही कलाकृती विशेष ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >