Sangli Accident News : शाळेतून घरी येताना कुटुंबावर काळ ओढावला; चिमुरडीसह वडिलांचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Sangli Accident News : सांगलीतील तासगाव मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअपला दुचाकीने मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात चिमुरडीसह वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. सागर बाबुराव जाधव (वय 37) आणि हर्षिता सागर जाधव (वय 5)अशी मृतांची नावे आहेत. तर आई सोनाली या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



नेमकं काय घडलं ?


गंभीर जखमी असलेल्या सोनाली जाधव या मणेराजुरी येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. पत्नीला आणण्यासाठी सागर जाधव हे मुलगी हर्षिताला घेऊन दुचाकीवरून निघाले होते. शाळेतून परत येत असताना वासुंबे हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिराजवळ थांबलेल्या पिकअपला दुचाकीने मागून धडक दिली. दुचाकीने दिलेली ही धडक इतकी भीषण होती की सागर आणि हर्षिता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आई सोनाली यांच्या डोक्याला मार लागला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली तसेच काही नागरिकांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तर सोनाली यांना तातडीने मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. (Sangli Accident News)


दरम्यान, मृत सागर जाधव हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बाबुराव जाधव यांचा मुलगा होते. त्यांच्या पत्नी सोनाली शहरातील मणेराजुरी रस्ता येथे असणाऱ्या एका शाळेत शिक्षिका आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. मात्र, या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने जाधव कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Dhule Accident News : शिरपूर - चोपडा रस्त्यावर भीषण अपघात, चार मजुर ठार

Dhule Accident News : शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाच्या शिवारात भीषण अपघात घडला आहे. भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Marathwada Special : मराठवाडा विशेष ! 17 सप्टेंबरचा स्वातंत्र्यसंग्राम ते आजचा मराठवाडा; जाणून घ्या या भूमीची संपूर्ण कहाणी

Marathwada Special : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला... पण भारताचा एक भाग असा होता, ज्याला स्वातंत्र्यासाठी आणखी १३ महिने

Weather Update : राज्यात पावसाची पूर्ण उघडीप! 17 सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा? जाणून घ्या हवामान खात्याने काय दिला इशारा...

Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Maharashtra Government : रेशन कार्डापासून परवान्यांपर्यंत सेवा होणार जलद; अन्न व नागरी पुरवठा विभागात GPR अंतर्गत मोठ्या सुधारणा

मुंबई : नागरिकांना शासकीय सेवा अधिक पारदर्शक, सुलभ, कालबद्ध आणि डिजिटल पद्धतीने मिळाव्यात, यासाठी अन्न, नागरी

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रलंबित विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच