Sangli ATM Theft : सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं, पुढे...

Sangli ATM Theft : एटीएम फोडून पैसे चोरण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, मात्र सांगलीत चोरट्यांनी चक्क संपूर्ण एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम कॉलेजसमोरील (Dr. Patangrao Kadam College) एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रातून चोरट्यांनी मशीन लांबवले. विशेष म्हणजे, या मशीनमध्ये तब्बल 10 लाख 34 हजार 800 रुपयांची रोकड होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा. लि.चे स्थानिक प्रतिनिधी विकास आमनगी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात (Sangli City Police Station) तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.



सुरक्षारक्षक नसल्याचा घेतला फायदा


पोलिसांच्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा. लि. कंपनीकडून विविध जिल्ह्यांमध्ये बँकांची एटीएम मशीन बसवली जातात. सांगली जिल्ह्यात कंपनीची सुमारे 40 एटीएम मशीन, तर सांगली शहरात 35 मशीन आहेत. मात्र, या एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नियुक्त नसल्याचे समोर आले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटे सांगलीवाडीतील एटीएम केंद्राजवळ आले. परिसरात सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून त्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर मशीनला जोडलेल्या वायरी तोडून संपूर्ण एटीएम मशीनच घेऊन चोरटे पसार झाले.



बुधवारी सकाळी एटीएम केंद्रात मशीन नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती बँक अधिकाऱ्यांना देण्यात आली. चोरीला गेलेल्या एटीएममध्ये 10 लाख 34 हजार 800 रुपये रोख, तर एटीएम मशीनची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, एकूण 11 लाख 84 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात (Sangli City Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सांगली जिल्ह्यात यापूर्वीही ATM चोरीचे प्रकार


सांगली जिल्ह्यात यापूर्वीही एटीएम चोरीच्या घटना घडल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग-आरग रस्त्यावरील खासगी बँकेचे एटीएम चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने उखडून नेले होते. त्या मशीनमध्ये सुमारे 27 लाख रुपये होते. तर बुधगाव येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून सुमारे 17 लाख 40 हजार रुपयांची रोकड चोरण्यात आली होती. डफळापूर येथेही मोटारीला दोरी बांधून एटीएम मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न झाला होता. आता सांगलीवाडीत चोरट्यांनी एटीएम फोडण्याऐवजी थेट मशीनच पळवल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस

न्यायालयीन लढ्याला राजकीय ठरवण्याचा डाव असल्याचा सतीश सालियन यांचा आरोप; सात दिवसांत माफीची मागणी मुंबई :

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी

Malegaon Robbery : मध्यरात्री घरात घुसले सशस्त्र दरोडेखोर, वृद्धेसह तिघांना मारहाण, लाखोंचा ऐवज लंपास

Malegaon Robbery : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक–आनंदवाडी शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडलीय.

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचं रहस्य काय ? डाएटबाबत पंतप्रधानांनीच सांगितल्या खास गोष्टी

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76वा वाढदिवस आहे. वय वाढत असताना फिटनेस आणि ऊर्जा टिकवून ठेवणं