मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. येत्या १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या पुलाच्या सर्व बाजूची सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या उड्डाणूपल प्रकल्पाची पाहणी केली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून हे पूल वाहतुकीसाठी मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे. प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंता, अधिकारी उपस्थित होते.(Sion station update)
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी२ ) अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६ वी) टाकणे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून शीव स्थानकाजवळील रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी करण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले आहे. तसेच, हा पूल ११२ वर्षे जुना व असुरक्षित ठरविण्यात आल्याने या पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले होते.(Sion station update)
मियामी: फुटबॉल विश्वाचा महानायक आणि महान खेळाडू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या नावावर एका विक्रमी टप्प्याची नोंद केली आहे. नू स्टेडियमवर ...
रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. या पूल प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागाच्या निधीमधून करण्यात येत आहे. निविदेनुसार या पुलाच्या पुनर्बांधणीचा कालावधी हा फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, तत्पुर्वीच हा पूल सुरू करण्याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.(Sion station update)
रेल्वे रुळांवरून जाणा-या ५०० टन वजनी पहिल्या पोलादी तुळईच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २१ ऑगस्ट २०२६ रोजी आणि दुसऱ्या पोलादी तुळईच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २९ ऑगस्ट २०२६ रोजी मध्य रेल्वेमार्फत करण्यात आले आहे. तसेच दोन्ही तुळ्यांचे अपघात प्रतिबंधक सुरक्षा कठड्याचे काम प्रगतिपथावर आहे. डेक स्लॅबच्या काँक्रिट वेअरिंग कोटचे कामदेखील प्रगतिपथावर आहे.
सद्यस्थितीत पुलाच्या पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहीदास मार्ग (धारावी) पर्यंतच्या पोहोच रस्त्याचे पुनर्बांधकाम हे मुंबई महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या पूर्वेकडील जागा अंशतः मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई महानगरपालिकेस २५ ऑगस्ट २०२६ पासून पोहोच रस्त्याच्या कामाकरिता हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वेकडील पोहोच रस्त्याचे काम मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. इतर सिमेंट काँक्रीटचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वे सोबत समन्वय साधून या पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वादळी फलंदाजी करत ...
हा नवीन उड्डाणपूल ५४.५ मीटरचा एकच लांब स्पॅन आणि २९ मीटर रुंदीचा आहे. या आराखड्यानुसार, पुलाखाली खांब नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात हा पूल सुरू झाल्यानंतर सायन, धारावी, कुर्ला आणि लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.(Sion station update)






